Cotton Season : कापूस पीक ठरले आतबट्ट्याचे

कापसाची खानदेश किंवा लगत उत्पादकता एकरी चार क्विंटल राहिली आहे. कापसाचा दर्जा मागील हंगामाच्या तुलनेत चांगला आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Cotton Market Update जळगाव ः कापसाला १३ हजार रुपये प्रति क्विंटल दराचा तयार केलेला फुगा यंदाचा उत्पादन खर्च वाढविणारा ठरला. खर्च वजा करून यंदा कापूस उत्पादक (Cotton Farmer) शेतकऱ्याला एकरी केवळ १४ हजार २१५ रुपये नफा म्हणजेच हंगामात प्रति दिन ३८.९५ रुपये नफा मिळत आहे.

कापसाची खानदेश किंवा लगत उत्पादकता (Cotton Productivity) एकरी चार क्विंटल राहिली आहे. कापसाचा दर्जा मागील हंगामाच्या तुलनेत चांगला आहे. उत्पादकता किंचित वाढली आहे. दरही (Cotton Rate) चांगले मिळतील, अशी अपेक्षा होती. कारण मागील हंगामात कापूस दर प्रति क्विंटल १० ते १३ हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते.

मागील हंगामात शेतकऱ्यांच्या कापसाची विक्री कमाल ७१००, ७५००, ८२५० रुपये प्रति क्विंटल या दरात झाली. शेतकऱ्यांकडील कापूस साठा संपल्यानंतर दर १० हजार रुपयांवर पोहोचले होते.

पुढे त्याचा लाभ रुई उत्पादक, निर्यातदार, कारखानदारांना झाला. कापूस दरातील तेजी एवढी वाढली, की शासनाला कापूस आयात वाढविण्यासाठी जून ते सप्टेंबर या कालावधीत ११ टक्के कापूस आयात शुल्क दूर करावे लागले.

कापूस दर चांगले आहेत, मोठा नफा शेतकऱ्यांना मिळत आहे, अशी अफवा बाजारात जोरात होती. परिणामी, पुढे खरिपात कापूस बियाणे, खते, कीडनाशके, तणनाशके, मजुरीचे दर वधारले.

Cotton Market
Cotton Export : कापूस निर्यात सुरळीत; सुतगिरण्याही फायद्यात

उत्पादन खर्च २०२०-२१ च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये व २०२२-२३ मध्ये सतत वाढला. या हंगामात उत्पादन खर्च तब्बल २५ टक्के वाढला. पण कापूस दर ऑक्टोबरपर्यंत नऊ हजार रुपये प्रति क्विंटलवर होते.

पुढे दर वाढतील, अशी अपेक्षा उत्पादकांना होती, यामुळे शेतकरी कीडनाशके, मजुरी आदींवर जादा खर्च करीत होते. परंतु दर नोव्हेंबरच्या मध्यानंतर नऊ हजार रुपयांखाली आले.

सध्या तर काही भागात ७७००, ७८०० व ८००० रुपये प्रति क्विंटलचा दर आहे. हा दर परवडणारा नाही. कारण या दरात कापसाची विक्री केल्यास शेतकऱ्याला फक्त ३८.९५ रुपये प्रति दिन निव्वळ नफा मिळत आहे.

Cotton Market
Cotton Market : कापसासाठी मार्च महिना महत्वाचा

कापसाचा प्रति एकर खर्च व उत्पादन दृष्टिक्षेपात

(खर्च रुपयांत)

नांगरणी ः १५००

रोटाव्हेटर किंवा शेत भुसशुशीत करणे ः १०००

लागवडीसाठी सऱ्या तयार करणे ः ७००

बियाणे ः १.५ बॅग ः ११२५

रासायनिक खते (सरळ व मिश्र खते मिळून) ः ३५६०

आंतरमशागत ः २८००

फवारणी ः २०००

तणनियंत्रण (किमान दोन वेळेस) ः १६००

वेचणी (तीन वेळेस) ः ३५००

(यात शेतकऱ्याची रोजची मेहनत व शेतातून शेतीमाल घरी आणण्याचा खर्च गृहीत धरलेला नाही)

एकूण खर्च ः १७७८५

उत्पादन (प्रति एकर) ः चार क्विंटल (सध्याच्या दरानुसार ३२ हजार रुपये)

निव्वळ नफा (एकूण ३२ हजार रुपये उत्पन्नानुसार) ः १४ हजार २१५

१४ हजार २२१ या निव्वळ नफ्यानुसार शेतकऱ्याला फक्त प्रति दिन ३८.९५ रुपये नफा किंवा रोज मिळतो.

मी बागायती (पूर्वहंगामी) कापसाची लागवड केली होती. नंतरही तीनदा कापसाचे सिंचन केले. उत्पादन सरासरी चार क्विंटल आहे. पण दर समाधानकारक नाहीत. यामुळे कापूस पीक सध्याच्या दरांनुसार अल्प नफा देणारे किंवा खर्चिक ठरले आहे. तणनाशकांचे दर दुप्पट वाढले आहेत. एक क्विंटल कापूस वेचणीसाठी अखेरपर्यंत अडीच ते तीन हजार रुपये मजुरी द्यावी लागली आहे. १० ते ११ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्यास पीक परवडू शकते.

- उत्तम काळे, कापूस उत्पादक, कुऱ्हे (जि. जळगाव)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com