आणखी तीन जहाजे तुर्कस्तानकडे रवाना

तुर्कियेच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनहून निघालेल्या या तीन जहाजांनी काळा समुद्र पार केला असून उद्या (ता. ६) ती तुर्कियेला पोहोचतील.
Russia Ukraine War
Russia Ukraine WarAgrowon

इस्तंबूल (वृत्तसंस्था) : युक्रेनमधून धान्याची निर्यात (Ukraine Food Export) सुरु झाल्यानंतर शुक्रवारी (ता. ५) आणखी तीन जहाजे एकूण ५८ हजार टन मका (Maize Export To Turkey) घेऊन तुर्कियेच्या दिशेने रवाना झाली. येथे या जहाजांची तपासणी होऊन नंतर ती लेबनॉनला पाठविली जाणार आहेत.

Russia Ukraine War
Cotton : पेरा वाढूनही कपाशी बियाणे विक्रीला मर्यादा

तुर्कियेच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनहून निघालेल्या या तीन जहाजांनी काळा समुद्र पार केला असून उद्या (ता. ६) ती तुर्कियेला पोहोचतील. प्रचंड आर्थिक संकटात असलेल्या लेबनॉनला हा धान्यपुरवठा केला जाणार आहे. या आधी पाठविलेल्या जहाजातूनही लेबनॉनलाच धान्य पुरविण्यात आले होते. युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धानंतर धान्याचे कोठार समजले जाणाऱ्या युक्रेनमधून धान्य निर्यात ठप्प झाली होती. तुर्किये आणि संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने ही निर्यात आता पुन्हा सुरु झाली आहे.

Russia Ukraine War
Soybean : पिवळ्या मोझॅक रोगाचा सोयाबीनवर प्रादुर्भाव

दरम्यान, युक्रेनच्या दोनेत्स्क भागातील काही गावांवर रशियाने आज जोरदार बाँबहल्ले केले. या हल्ल्यांमध्ये किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दोनेत्स्कवर रशियाने ताबा मिळविला असला तरी काही गावांमधून अजूनही विरोध होत आहे.

हल्ल्यांमुळे किरणोत्सर्गाचा धोका

रशियाने मायकोलेव्ह आणि झॅपोरिझ्झिया या शहराजवळच्या अणु प्रकल्पांवर हल्ले केल्याने किरणोत्सर्गाचा धोका निर्माण झाला असल्याचा इशारा ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेने दिला आहे. रशियाच्या हल्ल्यांमुळे प्रकल्पाचे नुकसान होत असल्याचेही या संस्थेने सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com