Tractor : ट्रॅक्टर खप घटला, निर्यातीत मात्र वाढ

भारतातील ट्रॅक्टर उद्योगासाठी जुलै महिना काहीसा संमिश्र ठरलाय. कारण यावर्षी सलग दुसऱ्या महिन्यात ट्रॅक्टर उत्पादनाच्या बाबतीत एक लाखाचा टप्पा गाठलाय सोबतच निर्यातही मजबूत राहिलीय.
Tractor Sale
Tractor SaleAgrowon

भारतातील ट्रॅक्टर उद्योगासाठी (Tractor Industry) जुलै महिना काहीसा संमिश्र ठरलाय. कारण यावर्षी सलग दुसऱ्या महिन्यात ट्रॅक्टर उत्पादनाच्या (Tractor Manufacturing) बाबतीत एक लाखाचा टप्पा गाठलाय सोबतच निर्यातही (Tractor Export) मजबूत राहिलीय. देशांतर्गत ट्रॅक्टरच्या विक्रीत (Tractor Sale In India) मात्र घट झाली आहे.

Tractor Sale
Tractor: देशातील ट्रॅक्टर विक्रीमध्ये वाढ

गेल्या वर्षीच्या आणि गेल्या महिन्याच्या तुलनेत ट्रॅक्टर विक्रीत घट झालेली आहे. २०२१ च्या जुलै महिन्याअखेर देशांतर्गत ट्रॅक्टरची विक्री ६५,२१६ युनिट्स इतकी होती. यावर्षीच्या जुलै महिन्याअखेर त्यात १५ टक्क्यांची घट होऊन विक्री ५५,२११ युनिट्सवर पोहोचली. तर जून महिन्याच्या तुलनेत ट्रॅक्टर विक्रीत जुलैमध्ये ४२ टक्के घट दिसत आहे. ट्रॅक्टर अँड मेकॅनायझेशन असोसिएशनने यासंदर्भातील आकडेवारी प्रसिध्द केली आहे.

Tractor Sale
Tractor: ट्रॅक्टर विक्रीमध्ये होतेय वाढ

पावसाचं असमान वितरण, तसेच लांबलेला खरीप हंगाम आणि वाढते व्याजदर यामुळे ट्रॅक्टर विक्रीत घट झाल्याचं दिसून आलं आहे. मॉन्सून रखडल्याने देशातील प्रमुख भात उत्पादक राज्यांत भाताची लागवड घटली. यंदाच्या आर्थिक वर्षात भाताचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम ट्रॅक्टर विक्रीवर झाला आहे.

उत्पादनात वाढ

देशांतर्गत ट्रॅक्‍टरचा खप कमी असला तरी, भारतात तयार झालेल्या ट्रॅक्टरची निर्यात वाढली आहे. जुलै २०२१ अखेर ११,१८७ युनिट्सची निर्यात झाली होती. जून २०२२ च्या अखेरीस निर्यात वाढून १२,८४९ युनिट्सवर पोहोचली. जुलै महिन्यात ट्रॅक्टर उत्पादनानेही जोर पकडला होता. सलग दुसऱ्या महिन्यात ट्रॅक्टर उत्पादनाने एक लाखाचा टप्पा ओलांडला. जुलैमध्ये १०१,४२१ युनिट्सचे उत्पादन घेण्यात आले.

मॉन्सूनची प्रगती, पावसाचे वाढलेले प्रमाण, ऐन सणासुदीचा हंगाम आणि शेतीत मिळलेल्या चांगल्या उत्पन्नामुळे या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत ट्रॅक्टर्सची विक्री वाढू शकते. जुलैमध्ये दिसणारी तूट हळूहळू सामान्य होण्याची अपेक्षा आहे. विश्लेषकांच्या मते, ट्रॅक्टरच्या मागणीत वाढ होण्यासाठी, नैऋत्य मॉन्सूनचं वेळेवर आगमन आणि ३६ पैकी २९ उपविभागांमध्ये सामान्य मॉन्सून, खरीप हंगामात विक्रमी उत्पादन होणे या गोष्टी निर्णायक ठरतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com