GST On Wheat : गव्हावर जीएसटी आकारणीवरून व्यापाऱ्यांचा आक्रोश

सोयाबीननंतर आता गव्हावर देखील पाच टक्‍के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याने देशभरातील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
GST On Wheat
GST On WheatAgrowon

नागपूर ः सोयाबीननंतर (Soybean) आता गव्हावर (GST On Wheat) देखील पाच टक्‍के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याने देशभरातील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. गव्हाच्या निर्यातबंदीच्या (Wheat Export Ban) निर्णयामुळे आधीच हवालदिल झालेल्या व्यापाऱ्यांनी या विरोधात देशव्यापी लढा उभारण्याचा निर्णय घेतला असून, या संदर्भाने चर्चेकरिता अखिल भारतीय उद्योग व्यापार संघाच्या पदाधिकाऱ्यांची सोमवारी (ता. ११) दिल्लीत बैठक बोलावण्यात आली आहे.

GST On Wheat
National Food Security Act : उत्तर प्रदेश, गुजरातला हवा वाढीव गहू

यंदा गहू हंगामाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने निर्यातीला मंजुरी दिली. परिणामी, व्यापाऱ्यांमधून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. निर्यात सौदे मोठ्या प्रमाणात झाल्याने देशांतर्गत बाजारात गव्हाच्या दरात इतिहासात पहिल्यांदाच वाढ नोंदविली गेली. प्रतिक्‍विंटल शेतकऱ्यांना २०० ते ३०० रुपये हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळू लागला. येत्या काळात गव्हाचे दर आणखी वाढण्याच्या शक्‍यतेने व्यापाऱ्यांनी लाखो क्‍विंटल गव्हाची साठेबाजी केली. सारे काही सुरळीत सुरू असतानाच केंद्र सरकारने १३ मेपासून अचानक निर्यातबंदी लादली. देशाची अन्नसुरक्षा धोक्‍यात येईल, अशी भीती सतावत असल्याने केंद्राकडून तडकाफडकी हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गव्हाची साठवणूककर्ते व्यापारी आणि दरात तेजीची अपेक्षा करणारे शेतकरी या दोघांचा अपेक्षाभंग झाला.

GST On Wheat
Wheat : गहू पीठ निर्यातीवर बंधने

अनेक व्यापाऱ्यांचा माल गुजरातमधील कांडला बंदरावर पोहोचला होता. परंतु ज्यांना परवानगी मिळाली आहे, अशाच व्यापाऱ्यांना गहू निर्यातीला मान्यता देण्यात आली. परिणामी अनेक व्यापाऱ्यांना गुजरात राज्यातील इतर व्यापाऱ्यांना खरेदी किमतीपेक्षा कमी दरात आपला माल नाइलाजाने विकावा लागला. खरेदी दरापेक्षा ३०० रुपये प्रतिक्‍विंटलचे नुकसान या व्यवहारात सोसावे लागले, असा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. या साऱ्या घडामोडीतून सावरत नाही तोच केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून गव्हावर पाच टक्‍के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

गहू हे खाद्यान्न असल्याने त्यावरील जीएसटीमुळे याचा व्यवहार प्रभावित होईल, सोबतच सामान्यांनाही महागाईची झळ सोसावी लागेल. सध्या गव्हावर १.७० पैसे बाजार शुल्क आकारले जाते. पाच टक्‍के जीएसटीची आकारणी झाल्यानंतर प्रतिक्‍विंटल १७० रुपये एकूण शुल्काचा भरणा करावा लागणार आहे. त्याचा थेट प्रभाव शेतकरी व सामान्य ग्राहकांवर पडणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु विक्रीवर जीएसटी लागेल की ब्रँडेड, अनब्रँडेड गव्हावर हे सध्या स्पष्ट नसल्याचे व्यापार संघाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. केंद्रीय अर्थमंत्रालयाने यापूर्वीच गव्हापासून तयार आटा, रवा, मैदा हे खाद्यान्न जीएसटीच्या कक्षेत आणले आहेत.

व्यापाऱ्यांवर भरमसाट कर लावत छोट्या व्यापाऱ्यांना संपविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे. आता गव्हावर जीएसटी लावण्याचा घेतलेला निर्णय हा बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फायद्यासाठी घेण्यात आला आहे. या मुद्द्यावर पुढील धोरण ठरविण्याकरिता दिल्लीत सोमवारी (ता. ११) बैठक बोलावण्यात आली आहे. त्यानंतर पुढील रणनीती ठरेल.

गोपालदास अग्रवाल, वरिष्ठ उपाध्यक्ष, भारतीय उद्योग-व्यापार संघ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com