Tur Arrival : खानदेशात तूर आवक घटली

खानदेशात तुरीची आवक मागील दोन ते तीन दिवसांत घटली आहे. किमान दर सात हजार रुपये प्रतिक्विंटल, असा आहे.
Tur Market
Tur MarketAgrowon

Tur Market News जळगाव ः खानदेशात तुरीची आवक (Tur Arrival) मागील दोन ते तीन दिवसांत घटली आहे. किमान दर (Tur Rate) सात हजार रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. तसेच काही भागांत देशी तुरीचे दर ७५०० रुपये प्रतिक्विंटलदेखील आहेत.

तुरीसाठी खानदेशात जळगावमधील रावेर, अमळनेर, धुळ्यातील दोंडाईचा व धुळे, नंदुरबार बाजार समिती प्रसिद्ध आहे. नंदुरबार बाजार समितीत यंदा सुरुवातीपासून तूर आवक कमी आहे.

खानदेशात सर्व प्रमुख बाजार समित्यांत मागील आठवड्यात प्रतिदिन ४०० क्विंटल तुरीची आवक नोंदविण्यात आली होती. ही आवक सध्या ३०० क्विंटलवर आली आहे. या आठवड्यात ही आवक आणखी घटली आहे.

Tur Market
Tur Import : केंद्राच्या आयातजीवी धोरणाचा तूर उत्पादकांना फटका

कारण तुरीची लागवड खानदेशात कमी असते. फक्त रावेर, चाळीसगाव, मुक्ताईनगर, बोदवड, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील नवापूर, नंदुरबार भागांत काही शेतकरी तुरीची प्रमुख पीक म्हणून लागवड करतात.

तर कमाल शेतकरी आपल्या कुटुंबास पुरेल एवढी तूर लागवड कापूस पिकात आंतरपीक म्हणून करतात. कमाल क्षेत्र दोन हजार ते २५००हेक्टर एवढे असते.

Tur Market
Tur Arrival : मलकापूर बाजार समितीत महिनाभरात तुरीची ९६ हजार क्विंटल आवक

रावेर, मुक्ताईनगर भागांत अधिक लागवड केली जाते. तुरीची मळणी सर्वत्र पूर्ण झाली आहे. तूर आवक मागील आठवड्यात बरी होती. यंदा उत्पादनही एकरी दोन ते पाच क्विंटल व सरासरी चार क्विंटल, असे आहे. उत्पादन हवे तसे नाही. कारण यंदा काही दिवस किंवा ऑक्टोबरमधील पावसाने पिकाचे नुकसान झाले.

जूनमध्ये कृत्रीम जलसाठ्याच्या मदतीने लागवड केलेल्या तूर पिकात अधिकचे नुकसान ऑक्टोबरमध्ये झाले आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसला.

परंतु कोरडवाहू क्षेत्रातील तूर पीक बरे होते. त्यातही अळी व इतर समस्या होत्या. फवारण्या दोन-तीनदा घ्याव्या लागल्या. यामुळे उत्पादन खर्च वाढला.

तूर आवक घटल्याने दरात किंचीत वाढ झाली आहे. मध्यंतरी किमान दर ६८०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. त्यात वाढ झाली आहे. तर कमाल दरही अनेक बाजार समित्यांत ७५०० रुपये किंवा यापेक्षा काहीसे अधिक आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com