Tur Rate : देशात तुरीचे दर तेजीतच

भविष्यातील तुरीच्या दरातील तेजी नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आयात तूर खरेदीची तयार केली. त्यासाठी सरकारने आधारभूत दरही जाहीर केला.
Tur Rate
Tur RateAgrowon

पुणे ः भविष्यातील तुरीच्या दरातील तेजी (Tur Rate) नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने आयात तूर (Tur Import) खरेदीची तयार केली. त्यासाठी सरकारने आधारभूत दरही (Tur MSP) जाहीर केला. आफ्रिकेतून आयात होणाऱ्या तुरीसाठी ५ हजार ९८० रुपये दर केंद्राने जाहीर केला; मात्र आफ्रिकेत काही कारणास्तव तूर आणि तूरडाळीच्या निर्यात (Tur Dal Export) प्रक्रियेत आडचणी येत आहेत. दुसरीकडे देशात तुरीचे दर (Tur Rate) तेजीत आहेत. तुरीचे दर सध्या ६ हजार ५०० रुपये ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तुरीच्या दरातील तेजी यंदा कायम राहील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

कोबीची आवक घटली

राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसाने भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला. यातून कोबीचे पीकही सुटू शकले नाही. सध्या बाजारातील कोबीची आवक सरासरीपेक्षा खूपच कमी होतेय. पुणे, मुंबई, कोल्हापूर आदी मोठ्या बाजारांतील आवक १०० क्विंटलपेक्षा कमी दिसते; मात्र इतर बाजारात २० क्विंटलपेक्षाही कमी कोबी विक्रीसाठी येतोय. तर कोबीला सध्या सरासरी १६०० रुपये ते ३ हजार रुपये दर मिळतोय. पुढील काळात कोबीचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Tur Rate
Soybean Rate : सोयाबीन बाजारात काय घटतंय ?

कापूस दर स्थिर

देशातील बाजारात सध्या नव्या कापासाची आवक पावसामुळे काहीशी कमी दिसत आहे. शेतकरी दिवाळीचा सण आणि रब्बी पेरणीसाठी काही काळ जास्त कापूस विक्री करू शकतात; मात्र गरज भागल्यानंतर दरात सुधारणा होईपर्यंत शेतकरी कापूस रोखू शकतात, असा अंदाज उद्योग क्षेत्रातून व्यक्त होतोय. सध्या कापसाला सरासरी ७ हजार ते ९ हजार ७०० रुपये दर मिळतोय; मात्र मागील हंगामात चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन कापसाची विक्री करावी, असे आवाहन जाणकारांनी केलेय.

Tur Rate
Cotton Sowing : कापूस लागवडीत नऊ टक्क्यांची वाढ

चवळीच्या दरात सुधारणा

चवळीच्या शेंगाचे दर सध्या तेजीत आहेत. चवळीच्या शेंगांची आवक सध्या नगण्य पातळीवर पोहोचली आहे; मात्र शेंगांना मागणी कायम आहे. चवळीच्या पिकालाही पावसाचा जोरदार तडाखा बसतोय. परिणामी, शेतकऱ्यांना पिकाची काढणी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे दरही तेजीत आलेत. सध्या चवळीच्या शेंगांना सरासरी २ हजार ५०० रुपये ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. चवळीच्या शेंगांचे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

सोयातेलाचे दर वाढले, सोयाबीनचे काय?

देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर स्थिर आहेत; मात्र सोयातेलाचे दर वाढले आहेत. रशियाने युक्रेनमधील टर्मिनल पोर्टवर हल्ला केल्याने तेथील कामकाज ठप्प पडलेय. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात सूर्यफूल तेलाची होणारी निर्यात थांबली. यामुळे बाजारात सूर्यफूल तेलाची टंचाई निर्माण होऊन सोयातेलाला मागणी वाढली. परिणामी, सोयातेलाचे दरही वाढले आहेत.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोयातेलाचे दर ७०.९७ सेंट प्रतिपाउंडवर पोहोचले आहेत. तर देशात १२३० ते १२४० रुपये प्रतिदहा किलोने सोयातेलाची विक्री होत आहे; मात्र सोयाबीन बाजार स्थिर दिसतोय. सध्या सुरू असलेल्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान केले. पिकाचे नुकसान होत असताना सोयाबीनच्या किमान दरात सुधारणा पाहायला मिळाली. कमाल दर मात्र वाढले नाहीत.

दुसरीकडे दिवाळी सणासाठी सोयाबीनची विक्री वाढल्याने बाजारातील आवक वाढलेली दिसते. त्यामुळे अनेक बाजारांत सध्या सोयाबीन दर दबावात दिसतात. सोयाबीनला ४ हजार २०० ते ५ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. सोयातेलाला मागणी वाढल्याने दरात वाढ झाली. मात्र सोयापेंडला उठाव दिसत नाही. त्यामुळे सोयाबीनचे दर स्थिर आहेत. दिवाळीनंतरही बाजारातील सोयाबीन आवक मर्यादित राहिल्यास दर वाढू शकतात; मात्र आवक वाढल्यास दर कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com