Tur Rate : तुरीचे भाव टिकून राहण्याचा अंदाज

देशातील बाजारात सध्या सोयाबीन आणि कापसाच्या दरात नरमाई आली आहे. त्यातच शेतकऱ्यांची तूर बाजारात दाखल झाली आहे. शेतकऱ्यांना तुरीला चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे.
Tur Rate
Tur RateAgrowon

पुणे ः देशातील बाजारात सध्या सोयाबीन (Soybean Rate) आणि कापसाच्या दरात (Cotton Rate) नरमाई आली आहे. त्यातच शेतकऱ्यांची तूर बाजारात (Tur Arrival) दाखल झाली आहे. शेतकऱ्यांना तुरीला चांगला दर (Tur Rate) मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या नव्या तुरीची आवक (Tur Arrival) हळूहळू वाढत आहे. तर दुसरीकडे आयातही जोमात सुरू आहे. तरीही तुरीचे दर बाजारात टिकून आहेत. तसेच पुढील काळातही तुरीला चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.

Tur Rate
Tur Market : तुरीला हमीभावापेक्षा जास्त दर मिळणार का?

देशात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तुरीची लागवड कमी झाली. त्यातच पावसाने तुरीच्या पिकाचे मोठे नुकसान केले. त्यामुळे यंदा देशातील तुरीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही बाजारांमध्ये तुरीची आवक सुरू झाली. मात्र काही भागांमध्ये लागवड उशिरा झाल्याने तूर काढणीलाही उशीर होत आहे. महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये तूर अद्यापही दाणे भरण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे ही तूर जानेवारीच्या मध्यानंतर बाजारात दाखल होऊ शकते, असा अंदाज आहे.

Tur Rate
Tur Market : तूर शेतकऱ्यांना दिलासा देणार

मात्र सध्या देशात तुरीची उपलब्धता कमी असल्याने दरातील तेजी कायम आहे. भारताने आफ्रिका आणि म्यानमारमधून मोठी खरेदी केली. त्यामुळे या देशांमध्ये तुरीची उपलब्धता कमी झाली आहे. त्यातच आयात तूर खरेदीत सरकारही उतरले आहे. त्यामुळे आयात तूर खेरदीत स्पर्धा आहे. स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादार सरकारने जाहीर केलेल्या दरापेक्षा जास्त किंमत देऊन आयात माल खरेदी करत आहेत. परिणामी, सरकारला आयात तूर कमी प्रमाणात मिळत आहे.

सध्या देशातील बाजारात नव्या तुरीची आवक होत आहे. मात्र आवकेचे प्रमाण कमी आहे. नव्या मालात सध्या १४ ते १७ टक्क्यांपर्यंत ओलावा येत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मात्र या तुरीलाही सध्या चांगला दर मिळत आहे. तुरीचा बाजारात मर्यादीत पुरवठा आहे. त्यातच बऱ्याच भागातील माल उशिरा बाजारात दाखल होणार आहे. त्यामुळे बाजार टिकून राहू शकतो.

सध्याची दरपातळी

सध्या देशातील बाजारात नव्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपये दर मिळत आहे. तर जुन्या मालाचा बाजारभाव ७ हजार ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान आहे. देशातील तूर उत्पादनातील घट ही सरकारच्या अंदजापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तुरीला यंदा सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने तुरीची विक्री करावी, असा जाणकारांचा सल्ला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com