Tur Sowing : खानदेशात तूर लागवड स्थिर

खानदेशात तूर लागवड सुमारे सात हजार हेक्टरवर झाली आहे. लागवड स्थिर आहे. परंतु अतिपावसाने पिकाला फटका बसला आहे.
Tur Sowing
Tur SowingAgrowon

जळगाव ः खानदेशात तूर लागवड (Tur Cultivation) सुमारे सात हजार हेक्टरवर झाली आहे. लागवड स्थिर आहे. परंतु अतिपावसाने पिकाला फटका बसला आहे. मागील हंगामातही सुमारे सात हजार २०० हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा लागवड वाढेल, असा अंदाज होता. कारण मागील हंगामात तूर पीक (Tur Crop) अतिपावसातही तग धरून होते. अनेकांना हंगामी तुरीचे चांगले उत्पादनही (Tur Production) आले. परंतु दर हवे तसे नव्हते. यातच कापसाला चांगले दर (Cotton Rate) मिळाल्याने अनेकांनी तूर लागवड वाढविण्याचे नियोजन मागे ठेवले व कापसाची लागवड (Cotton Cultivation) केली. यामुळे तूर लागवड वाढलेली नाही. जळगाव जिल्ह्यात सुमारे चार हजार हेक्टरवर तूर पीक आहे. तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे तीन हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.

Tur Sowing
Tur : एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रातून वाढवली उत्पादकता

जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात अधिकची तूर लागवड झाली आहे. या दोन्ही तालुक्यांत मिळून सुमारे दीड हजार हेक्टरवर तूर पीक आहे. तसेच चाळीसगाव, जामनेर, बोदवड, पारोळा, अमळनेर तालुक्यांतही तूर पीक बऱ्यापैकी आहे. यंदा पेरणी वेळेत झाली. तसेच पावसाचे आगमनही व्यवस्थित असल्याने लागवड यशस्वी झाली आहे. परंतु अतिपावसाने किंवा वाफसा स्थिती न तयार झाल्याने काळ्या कसदार जमिनीत तूर पिकाचा वरील भाग वाळला आहे. मर रोगाची समस्या असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. हलक्या, मध्यम जमिनीत मात्र पीक बरे आहे. त्यात आता आंतरमशागत सुरू आहे. काही शेतकरी फवारण्या घेत असून, तणनियंत्रणाचे कामही काही शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे.

Tur Sowing
Tur Sowing : जतमध्ये तूर क्षेत्रात ८०० हेक्टरने घट

मुक्ताईनगर, रावेर भागात अनेकांनी ठिबकच्या साह्याने मे अखेरीस तूर लागवड केली होती. पूर्वहंगामी किंवा बागायती तूर पिकाची वाढही जोमात आहे. त्यातही एकदा फवारणी घेण्यात आली आहे. बुरशीनाशके, संप्रेरकांची फवारणी या भागात झाली पिकात झाली आहे.

तूर पीक यंदा बऱ्यापैकी आहे. पण अतिपावसाने किंवा सततच्या पावसाने पिकाला काहीसा फटका बसला आहे. पीक पिवळेही झाले आहे. त्याची स्थिती सुधारण्यासाठी फवारणी, आंतरमशागतीची कामे हाती घेतली आहेत.
ऋषिकेश महाजन, शेतकरी, नायगाव, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com