Tur Rate : तुरीला उठाव मिळण्याच अंदाज

भारतात सध्या आफ्रिकेतील देशांमधून तूर आयात वाढत आहे. त्यामुळं तुरीच्या दरातील वाढ थांबली. मात्र दर अद्यापही ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान स्थिर आहेत.
Tur rate
Tur rate Agrowon

पुणेः भारतात सध्या आफ्रिकेतील देशांमधून तूर आयात (Tur Import) वाढत आहे. त्यामुळं तुरीच्या दरातील (Tur Rate) वाढ थांबली. मात्र दर अद्यापही ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान स्थिर आहेत. पुढील काळात आयात वाढण्याचा अंदाज असून तुरीच्या डाळीलाही उठाव मिळेल. त्यामुळं दर टिकून राहू शकतात, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Tur rate
Tur Rate : तुरीला उठाव कायम राहणार

देशात यंदा तुरीचं उत्पादन २० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी राहण्याचा अंदाज आहे. भारताला दरवर्षी ४५ ते ४६ लाख टन तुरीची आवश्यकता असते. तर देशातील उत्पादनही सरासरी त्याच दरम्यान असते. उत्पादन घटीच्या वर्षात भारताला आफ्रिकेतील देशांचा आधार मिळतो. मात्र या देशांमध्ये तूर खाल्ली जात नाही. त्यामुळं तेथील देशांसोबत करार केल्यानंतर तुरीचं उत्पादन घेतल्या जातं. नाहीतर आवश्यकतेप्रमाणं तूर मिळत नाही. त्यामुळं भारत सरकारने तसे करार केले. सरकारने तुरीचा पुरवठा वाढवण्यासाठी मार्च २०२३ पर्यंत मुक्त आयातीला परवानगी दिली आहे.

देशात यंदा तुरीची लागवड साडेचार टक्क्याने कमी झाली. तसेच पिकाला पावसाचा फटाक बसला. त्यामुळे केंद्राने यंदा देशात जवळपास ३९ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज जाहीर केला. उत्पादन यापेक्षा कमी असेल, असं उद्योग आणि व्यापारी सांगत आहेत. त्यामुळं दरात तेजी आली आहे. तसेच स्टाॅकिस्ट एकदम बाजारात विक्री करताना दिसत नाहीत. यामुळे दराला आणखी फोडणी मिळत आहे.

Tur rate
Tur Rate : आयात वाढूनही तूर तेजीतच

तुरीची खरेदी

सध्या आफ्रिकेतील देशांमध्ये नवी तूर बाजारात येत आहे. त्यामुळं आयात वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. सध्या आयात सुरु असून तुरीला मागणी सामान्य आहे. मिलर्स आवश्यकतेप्रमाणं तुरीची खरेदी करत आहेत. त्यामुळे दरात मोठी वाढ होण्याची शक्यता नसल्याचं काही अभ्यासक सांगत आहेत. त्यामुळं तुरीच्या दरातही चढउतार सुरु आहेत.

दर टिकून राहणार

सध्या तुरीला सरासरी ७ हजार २०० ते ८ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. सध्या तुरीला फार उठाव नसला तरी देशातील लग्न सराईचा हंगाम सुरु झाला आहे. पुढील महिन्यापासून तुरीला उठाव मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या काळात तुरीच्या डाळीला मागणी वाढेल. त्यामुळं भविष्यात आयात वाढली तरी दरात मोठी तेजी अपेक्षित नसली तरी घट होण्याची शक्यता नाही, असं तूर बाजारातील अभ्यासक सांगत आहेत.

आयातीचा परिणाम

गेल्यावर्षी देशात विक्रमी तूर आयात झाली होती. यंदा गेल्यावर्षीप्रमाणं विक्रमी आयात झाली तरी देशातील उत्पादन कमी राहणार आहे. त्यामुळं देशातील मागणीपेक्षा पुरवठा जास्त राहणार नाही. याचा आधार बाजाराला मिळेल, असंही बाजारातील जाणकारांनी सांगितलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com