Turmeric Rate : बाजारात हळदीचे दर टिकून

गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीचे दर टिकून आहेत. हळदीच्या दरात फारशी तेजी-मंदी होण्याची शक्यता नसून दर टिकून राहतील, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
Turmeric Rate
Turmeric RateAgrowon

Turmeric Market सांगली ः देशातील हळदीच्या बाजारपेठेत (Turmeric Market) दररोज ४० ते ५० हजार पोत्यांची (एक पोते ५० किलोचे) आवक (Turmeric Arrival) होत आहे. आतापर्यंत १० ते १२ लाख पोत्यांची विक्री झाली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीचे दर (Turmeric Rate) टिकून आहेत. हळदीच्या दरात फारशी तेजी-मंदी होण्याची शक्यता नसून दर टिकून राहतील, असा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

देशात हळद काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या देशातील हळदीच्या बाजारपेठेत हळदीची आवक वाढू लागली आहे.

सांगली, निजामाबादसह देशातील हळदीच्या प्रमुख बाजारपेठेत दररोज सुमारे ४० ते ५० हजार पोत्यांची आवक होत आहे. येत्या काही दिवसांत हळदीच्या आवकेत वाढ होईल.

Turmeric Rate
Turmeric Rate : हळदीचे दर दबावात

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात हळदीच्या दरात प्रति क्विंटलला २०० ते ३०० रुपयांनी सुधारणा झाली होती. त्यामुळे शेतकरी हळद विक्रीसाठी पुढे आले आहेत.

सध्या बाजारात हळदीची आवक वाढली असून देशांतर्गत बाजारपेठेसह परदेशात हळदीची मागणी वाढली आहे. त्यामुळे हळदीचे दर टिकून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिसाला मिळाला आहे.

Turmeric Rate
Turmeric Rate : नांदेडमध्ये नव्या हळदीला ६२०० रुपये दर

मेअखेर हंगाम चालणार

फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून हळद विक्रीची लगबग सुरू असून, शेतकरी हळद विक्रीसाठी गती आली आहे. हळदीचा खरा हंगाम मार्चपासून सुरू होतो. सुरू झालेल्या

हंगामात सर्वाधिक हळदीची आवक आणि विक्री होते. त्यामुळे मे अखेर पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू राहणार असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले आहे.

Turmeric Rate
Turmeric Rate : हळदीच्या दरात किंचित वाढ

दिवसातून दोनदा सौदे

सांगली बाजार समितीत हळदीची दररोज २० ते २५ हजार पोत्यांची आवक होत असून तेवढ्याच पोत्यांची विक्री होत आहे. सांगली बाजार समितीत आजअखेर अंदाजे ४ ते ५ लाख पोत्यांची विक्री झाली आहे. बाजार समितीत हळदीची आवक वाढल्याने दिवसातून दोन वेळा सौदे केले जात आहेत.

हळदीचे प्रतवारीनुसार दर (प्रति क्विंटल)

पावडर क्वालिटी...६५०० ते ७५००

मध्यम क्वालिटी...७५०० ते ८५००

उच्च प्रत...९००० ते १२०००

हळदीची आवक वाढत असून मागणी आणि उठावही होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीचे दर स्थिर आहेत. येत्या काळात हळदीचे दर टिकून राहण्याची शक्यता आहे.

- गोपाळ मर्दा, हळद व्यापारी, सांगली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com