Cotton Market : अकोट बाजारात यंदा कापसाची उलाढाल कमी

मागील काही वर्षांत कापूस बाजारपेठ म्हणून अकोटचा उदय झाला. येथे दरसुद्धा चांगले मिळाल्याने इतर जिल्ह्यांतून आवक व्हायची. यंदा दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कापूस रोखून धरल्याचा फटका बाजाराला बसत आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Akola Cotton Market News : मागील काही वर्षांत कापूस बाजारपेठ (Cotton Market) म्हणून अकोटचा उदय झाला. येथे दरसुद्धा चांगले मिळाल्याने इतर जिल्ह्यांतून आवक (Cotton Market) व्हायची.

यंदा दर (Cotton Rate) कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कापूस रोखून धरल्याचा फटका बाजाराला बसत आहे.

या हंगामात आतापर्यंत अकोटमध्ये साधारणपणे दीड लाख क्विंटल कापसाची उलाढाल (Cotton Turnover) झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत आवक कमी असल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले.

Cotton Market
Cotton Market : शेतकऱ्यांकडे अजून किती कापूस शिल्लक?

अकोट बाजार समितीच्या पुढाकाराने कापसाचा लिलाव केला जातो. खुल्या पद्धतीने व्यापारी बोली लावत असल्याने येथे चांगल्या कापसाला दर देण्यासाठी स्पर्धा निर्माण होत असते.

अकोट भागात जिनिंग प्रेसिंगची संख्याही काही वर्षांत वाढलेली असून, त्यांना हा कच्चा माल स्थानिक पातळीवर मिळतो. परिणामी, दर चांगले देण्याचा प्रयत्न राहतो.

या वर्षात कापसाचा सर्वत्र दर कमी असल्याने या बाजारात यंदा ९३०० पर्यंत सर्वाधिक दर मिळाला होता. तोसुद्धा सुरुवातीला काही कापसाला मिळाला. नंतरच्या काळात कापसाचा दर सातत्याने ८००० पर्यंत राहिला.

अकोटमध्ये बुधवारी (ता. ८) ८००० ते ८५७५ रुपये क्विंटल दर होता. बाजारात कापसाचा दर वाढेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी सध्या कापूस राखून ठेवलेला आहे.

गेल्या वर्षात १० हजारांवर दर मिळाल्याने शेतकरी यंदाही रास्त अपेक्षा ठेवून आहेत. त्यामुळे कापूस विक्रीला मोठा रोख तयार झालेला आहे. बाजारात उलाढालच कमी झाली आहे.

Cotton Market
Cotton Rate : कापसाच्या दरवाढीची शेतकऱ्यांना आशा

अकोट बाजार समितीत ऑक्टोबरपासून खरेदीला सुरुवात होते. यंदा आतापर्यंत सुमारे एक लाख क्विंटलपर्यंतही खरेदी-विक्री झालेली नाही. याच ठिकाणी आता खासगी खरेदीही केली जाते. तेथेसुद्धा ५० हजार क्विंटलच्या आतच कापूस उलाढाल झाली. दोन्ही मिळून दीड लाख क्विंटलपर्यंत कापूस खरेदी-विक्री झाल्याचे सांगण्यात येते.

अकोटमध्ये मार्च-एप्रिलपर्यंत कापसाची खरेदी-विक्री चालते. अद्याप दोन महिने शिल्लक असल्याने कापूस उलाढालीचा आकडा थोडा वाढेलही.

परंतु गेल्या हंगामात सुमारे पाच लाख क्विंटलपर्यंत झालेली उलाढाल, यंदा होईल की नाही, याबाबत खरेदीदारही साशंकता व्यक्त करीत आहेत.

या भागातील काही मोठे शेतकरी दर्यापूर भागातील जिनिंगमध्येही नेऊन थेट विक्री करीत आहेत. एकूणच अकोटच्या बाजारात या वर्षात कापूस खरेदी-विक्रीत घट झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com