उसाच्या क्षेत्रात दोन टक्क्यांनी वाढ

२०२२-२३ च्या उस हंगामातील लागवडीखालील क्षेत्रामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत २ टक्क्यांनी वाढ झाली
उसाच्या क्षेत्रात दोन टक्क्यांनी वाढ
Sugarcane AreaAgrowon

देशात उसाचे (sugarcane) क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे साखर उत्पादनात (Sugar Production) विक्रमी घोडदौड सुरूच आहे. २०२२-२३ च्या उस हंगामातील लागवडीखालील क्षेत्रामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत २ टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण उस लागवडी पैकी सर्वसाधारण ९८ टक्के क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे. इतर पिकांऐवजी उसाचं पीक घेण्यामागे दरातील तफावत हेच प्रमुख कारण आहे.

गेल्यावर्षी २ जूनपर्यंत देशात ४५.८१ लाख हेक्टरवर उसाचे लागवड झाली होती. यंदा त्यामध्ये वाढ होऊन ४६.६७ लाख हेक्टरवर क्षेत्रावर लागवड झाली आहे. यंदा साखर कारखान्यांनी उसाचे बिल थकवले नाहीत. अन्न मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, उस उत्पादकांना २०२१-२२ हंगामात कारखानादारांकडून १०९२८३ कोटी रुपयांपैकी ९२४४७ कोटी मिळाले आहेत. म्हणून पुढील हंगामासाठी उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे, असे जाणकार सांगतात.

केंद्र सरकारने साखर निर्यातीवर मर्यादा घातल्यामुळे कारखानदार नाराज आहेत. देशातील सर्वाधिक उसाचे उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेशमध्ये पुढील हंगामासाठी ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. तर कर्नाटकमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ऊसाच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसते. अजून केंद्र सरकारने पुढील हंगामासाठीचा उसाचा एफआरपी जाहीर केला नाही. एफआरपी जाहीर केल्यानंतर लागवडीखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, चालू हंगामात २९० रुपये प्रति क्विंटल एफआरपी देण्यात आला होता. त्यात वाढ करून ३०५ रुपये प्रति क्विंटल दर देऊन रिकव्हरी रेट १० ऐवजी १०.२५ करावा अशी शिफारस कृषी मूल्य आयोगाने केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com