Sugar Production : साखर उत्पादनात उत्तर प्रदेश आघाडीवर राहण्याची शक्यता

गेल्या वर्षी निर्विवादपणे साखर उत्पादनात आघाडी घेतलेल्या महाराष्ट्राला यंदा ही आघाडी टिकवण्यात अडचणी येत आहेत.
Sugar Production
Sugar ProductionAgrowon

Sugar Season गेल्या वर्षी निर्विवादपणे साखर उत्पादनात (Sugar Production) आघाडी घेतलेल्या महाराष्ट्राला यंदा ही आघाडी टिकवण्यात अडचणी येत आहेत.

सध्या महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशचे साखर उत्पादन कमी असले तरी, उत्तर प्रदेशात अजूनही साखर उत्पादन सुरू असल्याने कदाचित उत्तर प्रदेश, महाराष्ट्रापेक्षा जादा साखर उत्पादन करू शकतो, असा अंदाज आहे.

देशात अंदाजापेक्षा साखर उत्पादन घटतच आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या उत्पादनाबरोबर यंदा उत्तर प्रदेशचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

एप्रिलच्या मध्यापर्यंत देशात ३११ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा उत्तर प्रदेशमध्ये १०१ लाख टन उत्पादन झाले आहे. उत्तर प्रदेशात अजूनही साखर कारखाने सुरू असल्याने यंदा उत्तर प्रदेशात महाराष्ट्राइतकी किंबहुना महाराष्ट्रापेक्षा जास्त साखर उत्पादित होण्याचा अंदाज आहे.

Sugar Production
Sugar Production : साखरनिर्मिती १०४ लाख टनापर्यंतच रखडली

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) नुकत्याच झालेल्या बैठकीत साखर उत्पादनाचा अंदाज साडेतीन टक्क्यांनी घटवून ३२८ लाख टनांपर्यंत खाली आणला आहे. जानेवारीमध्ये हाच अंदाज ३४० लाख टनांपर्यंतचा होता.

गेल्या वर्षी प्रचंड वेगात असणारा महाराष्ट्र व कर्नाटकातील साखर हंगाम यंदा अपेक्षेपेक्षा लवकर संपला. याचा फटका साखर उत्पादनाच्या अंदाजावरही झाला.

Sugar Production
Sugar Production : राज्यातील साखर उत्पादन घटीचा देशाला फटका

जानेवारीमध्ये महाराष्ट्रात १२१ लाख टन साखर तयार होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण अंदाजापेक्षा तब्बल १५ लाख टन साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अनेक संस्थांनी जादा साखर उत्पादनाचे अंदाज व्यक्त केले होते. पण जसा हंगाम पुढे जाईल तसे सर्व अंदाज चुकत गेले.

उत्तर प्रदेशमध्ये मात्र कमी उत्पादनाचा अंदाज होता. सध्याचा हंगाम पाहता या हंगामात उत्तर प्रदेशचे साखर उत्पादन देशात जादा असण्याची शक्यता आहे. एक ते दोन लाखांच्या फरकाने उत्तर प्रदेश महाराष्ट्रापेक्षा साखर उत्पादनात आघाडीवर असू शकतो, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com