Beans Rate : ऐन हंगामात वालपापडीने खाल्ला भाव

थंडीच्या हंगामात येणाऱ्या वसईतील वालपापडीचा भाव हंगामाच्या सुरुवातीलाच वधारला आहे. बाजारात ही वालपापडी ३०० रुपये किलो या दराने विकली जात आहे; तरीही वालाच्या शेंगा खरेदीसाठी नागरिकांची पावले वळू लागली आहेत.
Beans Rate : ऐन हंगामात वालपापडीने खाल्ला भाव

वसई : थंडीच्या हंगामात येणाऱ्या वसईतील वालपापडीचा (Papdi Beans Rate) भाव हंगामाच्या सुरुवातीलाच वधारला आहे. बाजारात ही वालपापडी (Papdi Beans) ३०० रुपये किलो या दराने विकली जात आहे; तरीही वालाच्या शेंगा खरेदीसाठी नागरिकांची पावले वळू लागली आहेत. वसईतील काळीभोर वांगी बाजारात आली असून ती १२० रुपये किलोने उपलब्ध आहे. तसेच अन्य भाज्यांचे भावही वधारले आहेत.

Beans Rate : ऐन हंगामात वालपापडीने खाल्ला भाव
Vegetables Market : नाशिकमध्ये वालपापडी घेवड्याच्या आवकेत वाढ;दरात घसरण

वसईत वालपापडी व वांग्याची लागवड नाळा, सत्पाळा, गास, उमराळे आदी भागात केली जाते. थंडीच्या काळात हे पीक येत असते. चवीला उत्कृष्ट, सुगंधित व पौष्टिक असल्याने वालपापडी व वांग्याची प्रतीक्षा नागरिक करत असतात. हंगामाच्या सुरुवातीलाच या भाजीचा आस्वाद घेता यावा म्हणून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे.

Beans Rate : ऐन हंगामात वालपापडीने खाल्ला भाव
Vegetable Market : सोलापुरात गाजर, काकडीला उठाव, दरही टिकून

उकडहंडी, पोपटीचे वेध

वालाच्या शेंगांचा हंगाम असल्याने ‘पोपटी’ आणि ‘उकडहंडी’चे वेध सुरू झाले आहेत. या दोन्ही प्रकारात ग्रामीण भागात मिळणाऱ्या वालपापडी हा प्रमुख घटक आहे. बाजारात वालपापडी उपलब्ध झाल्याने उकडहंडी आणि पोपटीचे बेत आखले जाऊ लागले आहेत. नाशिक, तसेच पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या वालपापडीपेक्षा येथील वालपापडीपेक्षा अधिक चविष्ठ असते; पण बाजारात मागणीपेक्षा कमी प्रमाणात माल येत असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे.

शुभकार्यात पसंती

वसईच्या पश्चिम भागात होणाऱ्या शुभकार्यात वाल-वांगी भाजीला अधिक पसंती दिली जाते. लग्नसराई सुरू असल्याने वांगी व वालपापडी खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे. मात्र मागणी अधिक व शेतमाल कमी येत असल्याने भाव वाढले आहेत. काही दिवसांनी किमती कमी होतील, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

भाज्यांचे दर प्रतिकिलो

वांगी १२० रुपये

भेंडे १२० रुपये

गवार १२० रुपये

सुरण १०० रुपये

दुधी ४० रुपये

मुळा ३० रुपये

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com