Warana Milk : दूध उत्पादक, कर्मचाऱ्यांना ‘वारणा’ देणार ५४ कोटी ६३ लाख

दूध संघाच्या इतिहासात प्रथमच दीपावलीनिमित्ताने दूध उत्पादकांना म्हैस दुधासाठी प्रतिलिटर २ रुपये ३० पैसे, तर गाय दुधासाठी १ रुपये १० पैसे इतके उच्चांकी फरकबिल देण्याचा निर्णय संघाच्या संचालक मंडळाने घेतला आहे.
Warana Milk
Warana MilkAgrowon

वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी दूध संघामार्फत (Warana Doodh Sangh) दिवाळीसाठी उत्पादकांना (Milk Producer) दूध फरक बिल, दूधबिल, कामगारांना पगार व बोनसचे (Milk Bonus) तब्बल कोटी ५४ कोटी ६३ लाख रुपये देणार असल्याची माहिती वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी दिली.

Warana Milk
Milk Rate : जागतिक दूग्ध व्यवसाची उलाढाल सर्वाधिक

दूध संघाच्या इतिहासात प्रथमच दीपावलीनिमित्ताने दूध उत्पादकांना म्हैस दुधासाठी प्रतिलिटर २ रुपये ३० पैसे, तर गाय दुधासाठी १ रुपये १० पैसे इतके उच्चांकी फरकबिल देण्याचा निर्णय संघाच्या संचालक मंडळाने घेतला आहे. उत्पादकांच्या खात्यावर फरकबिल, दूधबिल, कामगारांचा बोनस जमा करण्यात येत आहे.

Warana Milk
Goat Milk : शेळीचे दूध आरोग्यदायी का मानले जाते?

बाजारात वारणाच्या दूध व दुग्ध पदार्थांना मागणी वाढली असून, राज्य तसेच राज्याबाहेरील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे व विक्रीत वाढ झाल्याचे अध्यक्ष डॉ. कोरे यांनी सांगितले. तसेच दिवाळीसाठी संघ कर्मचाऱ्यांना ११ टक्के इतका बोनस देण्याचा निर्णय घेतला असून, कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

दूध संघाशी संलग्न तात्यासाहेब कोरे दूध-साखर वाहतूक संस्था, सावित्री महिला औद्योगिक संस्था, अमृत सेवक पतसंस्था व डॉ. आर. ए. पाटील पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना एकाचवेळी बोनस देण्यात येणार आहे, असे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com