Nashik Vegetable Market : नाशिकमध्ये भाजीपाल्याच्या दरात चढउतार

कृषी उत्पन्न बाजार समितीत वालपापडी-घेवड्याची आवक ५९७३ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल दर २५०० ते ४४००, तर सरासरी दर ३२०० रुपये राहिला
Nashik Vegetable Market
Nashik Vegetable MarketAgrowon

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत Nashik APMC) वालपापडी-घेवड्याची आवक (Ghevda Rate) ५९७३ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल दर २५०० ते ४४००, तर सरासरी दर ३२०० रुपये राहिला. घेवड्याला प्रतिक्विंटल दर १५०० ते २५००, तर सरासरी दर २००० रुपये राहिला. गत सप्ताहात आवकेत वाढ झाल्याने बाजारभाव स्थिर होते.

Nashik Vegetable Market
Vegetable Production : बारमाही भाजीपाला उत्पादनातून उंचावले अर्थकारण

सप्ताहात भाजीपाल्याच्या आवकेनुसार दरात चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळाले. हिरवी मिरचीची आवक १६१२ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल ३००० ते ४५०० रुपये तर सरासरी दर ४००० रुपये मिळाला. गाजराची आवक २८०४ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २५०० तर सरासरी दर २००० रुपये राहिला.

Nashik Vegetable Market
Vegetable Market :‘देशी पावट्या’ने तोडला दराचा विक्रम

उन्हाळ कांद्याची आवक ७५६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३०० ते १००१ तर सरासरी दर ९०० रुपये राहिला. लाल कांद्याची आवक ९६१९ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १००० ते १५०१ तर सरासरी दर १२५१ रुपये राहिला. लसणाची आवक १६८ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १६०० ते ४५०० तर सरासरी दर २२०० रुपये राहिला.

बटाट्याची आवक १२१८६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ११५० ते १८०० तर सरासरी दर १५०० रुपये राहिला. आल्याची आवक ५१२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४००० ते ५००० तर सरासरी दर ४५०० रुपये राहिला.

फळभाज्यामंध्ये टोमॅटोला किमान ५० ते कमाल २०० तर सरासरी १२०, वांगी किमान ३०० ते कमाल ८०० तर सरासरी ५५०, फ्लॉवर किमान ५० ते कमाल २०० सरासरी १६० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले. तर कोबीला किमान ३० ते कमाल ६० तर सरासरी ४० रुपये असे दर प्रति २० किलोस मिळाले.

ढोबळी मिरचीला किमान १५० ते कमाल २२५ तर सरासरी दर २०० रुपये दर प्रति ९ किलोस मिळाले. वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा ६० ते २७५ तर सरासरी १८०, गिलके २५० ते ४०० तर सरासरी ३२५, दोडका ७०० ते १००० तर सरासरी दर ८०० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले.

फळांमध्ये केळीची आवक १,०४२ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल ७०० ते १४०० तर सरासरी दर १००० रुपये मिळाला. डाळिंबाची आवक ८० क्विंटल झाली. मृदुला वाणास ५०० ते १२००० तर सरासरी ९००० रुपये दर मिळाला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com