Vegetables Rate : पुण्यात भाजीपाल्यांचे दर स्थिर

सरासरीच्या तुलनेत केवळ ५० टक्केच आवक
vegetabels
vegetabelsAgrowon

पुणे ः दिवाळी हंगाम (Diwali Season) सुरू असल्याने पुणे बाजार समितीमधील (Pune APMC) भाजीपाल्याची आवकदेखील मंदावली आहे. मंगळवारी (ता. २५) बाजार आवारात केवळ ४० ते ५० ट्रक भाजीपाल्याची आवक झाली होती. सरासरीच्या तुलनेत केवळ ५० टक्के आवक झाली होती. आवक घटल्याने आणि आवकेच्या तुलनेत मागणी असल्याने सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.

तर फुलबाजारात देखील गेल्या तीन, चार दिवसांच्या तुलनेत आवक ५० टक्क्यांनी घटली होती. मात्र बुधवारी (ता. २६) असलेल्या पाडवा सणामुळे फुलांना मागणी होती. यामुळे बहुतांश फुलांच्या दरात वाढ झाली होती. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने रविवारी (ता.२३) झेंडूची राज्याच्या विविध भागांतून आवक झाली होती. या आवकेत भिजलेल्या फुलांचे प्रमाण जास्त असल्याने दर कमी झाले होते. मात्र मंगळवारी (ता. २५) आवक घटल्याने दर वाढले होते.

विविध फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे ः

झेंडू - ५०-१००, गुलछडी -१००-१५०, बिजली ५०-८०, कापरी २०-१००, ॲस्टर (चार जुड्या) - २०-४०, गुलाब गड्डी (१२ नग) ३०-६०, डच गुलाब (२० नग) ६०-१२०, जरबेरा -३०-५०, कार्नेशन ८०-१५०, लिली बंडल (५० काडी) २५-३५.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com