Vegetable Market Rate : गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर स्थिर

विजयदशमीच्या दुसऱ्या दिवशीची गुरुवारी (ता. ६) आणि शनिवारी (ता. ८) च्या साप्ताहिक सुट्टी अशा दोन दिवसांच्या सुट्ट्यानंतर आलेल्या रविवारी (ता. ९) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरिपाच्या हंगामातील भाजीपाल्याची विक्रमी सुमारे ११० ट्रक आवक झाली होती.
Vegetable Rate
Vegetable RateAgrowon

पुणे ः विजयदशमीच्या दुसऱ्या दिवशीची गुरुवारी (ता. ६) आणि शनिवारी (ता. ८) च्या साप्ताहिक सुट्टी अशा दोन दिवसांच्या सुट्ट्यानंतर आलेल्या रविवारी (ता. ९) पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Pune APMC) खरिपाच्या हंगामातील (Kharif Season) भाजीपाल्याची विक्रमी सुमारे ११० ट्रक आवक (Vegtable Arrival) झाली होती. तर नवरात्रीचे उपवास संपल्याने विविध भाजीपाल्याला मागणी (Vegetable Demand) वाढल्याने आवक जास्त होऊन सुद्धा कांदा, बटाटा, शेवगा, वालवर, पापडीच्या दरांत वाढ झाली होती. तर इतर फळभाज्यांची आवक (Fruit Vegetable Arrival) आणि मागणी सुरळीत असल्याने दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर होते

Vegetable Rate
Vegetable Rate : भाज्यांचे आवक अल्पच, दरातही चढउतार

राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून झालेल्या आवकेमध्ये कर्नाटक, गुजरात येथून सुमारे १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक येथून ३ टेम्पो कोबी, इंदौर येथून ५ टेम्पो गाजर, कर्नाटक येथून ४ टेम्पो घेवडा, गुजरात येथून ५ टेम्पो भुईमूगशेंग, मध्य प्रदेशातून लसणाची १० ट्रक आवक झाली होती.

तर स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी ७ टेम्पो, टोमॅटो सुमारे ८ हजार क्रेटस, हिरवी मिरची, ढोबळी मिरची आणि फ्लॉवर प्रत्येकी १० टेम्पो, कोबी ५ टेम्पो, गाजर ५ टेम्पो, मटार १०० गोणी, तांबडा भोपळा ८ टेम्पो, कांदा ५० ट्रक, आग्रा, इंदौर, स्थानिक भागातून बटाटा ५० ट्रक आवक झाली होती.

Vegetable Rate
Vegetable Rate : नगर जिल्ह्यात भाजीपाल्याच्या दरात सुधारणा

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : १८०-२३०, बटाटा : १७०-२६०. लसूण : १००-४००, आले : २००-४००, भेंडी : ३००- ४००, गवार : गावरान व सुरती ३००-६००, टोमॅटो : १५०-३००, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : २५०-४५०, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २००-२५०, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी :२००-२५०, पापडी : ४५०-५००, पडवळ : २००-२५०, काकडी : १००-१२०, फ्लॉवर : १६०-२००, कोबी : १६०-२००, वांगी : ३००-४००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : २००-२५०, शेवगा : १०००-१२००, गाजर : ३००-४००, वालवर : ६००-७००, बीट : ३००-३५०, घेवडा : ३००-४००, कोहळा : १००-२००, आर्वी :२००-२५०, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ४००-४५०, मटार : स्थानिक: १२००-१५००, पावटा : ६००- ६५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

Vegetable Rate
Vegetable Rate : सोलापुरात कोथिंबीर, मेथीसह हिरव्या मिरचीला उठाव

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची दोन लाख तर मेथीची ५० हजार गड्ड्यांची आवक झाली.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ८००-१५००, मेथी : ८००-१५००, शेपू : ४००-६००, कांदापात : ८००-१५००, चाकवत : ६००-८००, करडई : ४००- ७००, पुदीना : ३००-५००, अंबाडी : ४००-६००, मुळे : ८००-१५००, राजगिरा : ५००-७००, चुका : ४००-१०००, चवळई : ४००-६००, पालक : १०००-१५००.

फळ बाजार

फळ बाजारात रविवारी (ता.९) लिंबाची सुमारे ३ हजार गोणी, डाळिंब ४० टन, पपई १० टेम्पो, चिक्कू ४०० गोणी, मोसंबी ८० टन, संत्रा ३० टन, पेरू ८०० क्रेट, कलिंगड १० तर, खरबूज ५ पिकअप, सीताफळ ३० टन आवक झाली होती.

विविध फळांचे दर पुढीलप्रमाणे

लिंबे (गोणीस) - ४००-७००, डाळिंब (किलो) गणेश - १०-४०, भगवा ५०-२५०, आरक्त १०-७०, पपई प्रति किलो -१२-२५, पेरू (२० किलो) -३००-५००, सीताफळ - २०-१००, कलिंगड १५-२५ खरबूज ३०-४०, मोसंबी ३ डझन १३०-३००, ४ डझन ४०-१२०. संत्रा (१० किलो) २००-५००.

---------

फुलबाजार

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी :

५०-१००, अष्टर : जुडी १०-२०, सुट्टा ८०-१००, बिजली : २०-५०,

कापरी : १०-४०, शेवंती : ५०-१००, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : २०-५०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ८०-१२०, शेवंती काडी १००-२५०, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ३००-५००, ग्लडिओ (१० काड्या) : ६०-१२०, जुई : ३००-४००.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com