Soybean Rate : प्रक्रिया उद्योगातील अस्थिरतेने सोयाबीन वायदा बंदीला समर्थन

वायदे बाजारातील दरात होणाऱ्या चढउताराचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक होत आहे. प्रक्रिया उद्योग क्षेत्राला या अस्थिरतेचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.
Soybean import
Soybean importAgrowon

नागपूर ः वायदे बाजारातील दरात होणाऱ्या चढउताराचा (Fluctuation In Futures Rate) फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक होत आहे. प्रक्रिया उद्योग क्षेत्राला (Soybean Processing Industry) या अस्थिरतेचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळेच सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाने (Soybean Processor Association Of India) वायदे बाजारातील सोयाबीन व्यवहार बंदीचे (Soybean Future Ban) समर्थन केल्याचा दावा करण्यात आला आहे.

‘‘सोपा’ला हवे स्वस्तात सोयाबीन’

वायदे बाजारामुळे भविष्यात संबंधित शेतीमालाला काय दर राहतील, याची माहिती मिळते. त्याआधारे शेतकऱ्‍यांना साठवणूक व विक्रीबाबतचा निर्णय घेता येतो. मात्र, देशात काही शेतमालाच्या दरात चांगलीच तेजी आल्याने महागाई वाढल्याचा कांगावा करण्यात आला. त्याच आधारे सरकारच्या निर्देशावरुन काही शेतमालाच्या वायदे व्यवहारांवर ‘सेबी’ने बंदी आणली.

Soybean import
Soybean Rate: देशातून सोयापेंड निर्यात का वाढतेय ?

‘सेबी’चा हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप त्यानंतर काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी केला. ‘सोपा’ ही प्रक्रिया उद्योजकांची संघटना असल्याने त्यांना प्रक्रियेकामी स्वस्तात सोयाबीन हवे असल्यानेच त्यांनी वायदे बाजारातील सोयाबीन बंदीचे समर्थन केल्याचे या कंपन्यांचे म्हणणे होते. ‘सोपा’च्या वतीने मात्र हा दावा फेटाळण्यात आला आहे.

Soybean import
Soybean Pest : सोयाबीनसह कपाशीवर अळीचा प्रादुर्भाव

‘सोपा’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रक्रियेकामी स्वस्त सोयाबीन हवे, हे म्हणणे चुकीचे आहे. सोयाबीनचा हमीभाव ४३०० रुपये क्विंटल असताना त्यापेक्षा अधिक दरातच सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. प्रक्रिया खर्च जोडून उद्योजकांना आपली उत्पादने विकावी लागतात. दुसरीकडे महागाई वाढल्याचे सांगत सरकार स्वस्तात तेल विकण्याचे सांगते. त्यामुळे महागडे सोयाबीन खरेदी करून स्वस्तात प्रक्रियाजन्य पदार्थ विकणे कसे शक्य आहे. देशात पोल्ट्री उद्योजकांकडून सोयाबीन डिओसीचा वापर होतो.

गेल्यावेळी तुटवडा निर्माण झाल्याने सोयाबीन व परिणामी सोया पेंडेच्या दरात चांगलीच तेजी आली होती. पोल्ट्री उद्योग यामुळे सर्वाधिक प्रभावित झाल्याने केंद्र सरकारला यामध्ये हस्तक्षेप करीत सोया पेंड आयात करावी लागली होती. अशाप्रकारे अनेक क्षेत्र महागडे सोयाबीन खरेदी केल्याने प्रभावित होतात. सध्या देखील हमीभावापेक्षा अधिकचाच दर सोयाबीनला मिळत असताना तो कमी आहे, असे भासविले जात आहे. परंतु, कच्च्या मालात तेजी आल्यास इतर क्षेत्रही प्रभावित होतात, ही बाबही समजून घेणे गरजेचे आहे.

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत व्यापाऱ्यांव्दारेच सोयाबीन वायदा सुरु करण्याची मागणी होत आहे. दरातील तेजीचा फायदा केवळ व्यापाऱ्यांनाच होतो. त्यामुळे त्यांच्याव्दारे हे मनसुबे रचले जातात. वायदे बाजारात अचानक होणाऱ्या चढउतारामुळे प्रक्रिया उद्योजकांना अस्थिरतेचा सामना करावा लागतो. त्याच कारणामुळे सोयाबीन वायदा बंदीचे समर्थन केले आहे.
डी. एन. पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘सोपा’.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com