Tur Import : तूर आयातीचा दरावर काय परिणाम होईल?

देशात सध्या आफ्रिका आणि म्यानमार देशातून तुरीची आयात वाढत आहे. त्यातही आफ्रिकेतील देशांमध्ये नवी तूर हाती आली. या तुरीला भारतात पाठवले जात आहे.
Tur Import
Tur ImportAgrowon

पुणेः देशात सध्या आफ्रिका आणि म्यानमार देशातून तुरीची आयात (Tur Import) वाढत आहे. त्यातही आफ्रिकेतील देशांमध्ये नवी तूर (Tur Rate) हाती आली. या तुरीला भारतात पाठवले जात आहे. आयातीत आफ्रिकेतून येणाऱ्या तुरीचेच प्रमाण जास्त आहे. तसेच ही तूर स्वस्त असल्याने त्याचा परिणाम देशातील बाजारावर (Tur Market) होत आहे.

Tur Import
Tur Pest : तुरीवर शेंगा पोखरणारी अळी

देशातील शेतकऱ्यांची तूर सध्या फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. मात्र दुसरीकडे बाजारात मागील काही महिन्यांपासून मोठी उलथापालथ सुरु आहे. यंदा तुरीची लागवड कमी झाली. त्यातच स्टाॅकिस्ट आणि प्रक्रियादारांनी तुरीचा साठा मागे ठवला. परिणामी तुरीच्या दरात मोठी वाढ झाली. तुरीच्या दरावर नियंत्रण राहावे आणि साठा उपलब्ध असावा, यासाठी केंद्र सरकारने आफ्रिकेतील देश आणि म्यानमारमधून आयात तुरीची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Tur Import
Tur Rate : आयातीमुळे तुरीच्या दरातील तेजीला ब्रेक?

देशात सध्या आफ्रिकी देशांमधून कमी दरात तुरीची आयात वाढत आहे. या देशांमध्ये सध्या नव्या तुरीची आवक सुरु झाली. ही तूर लगेच भारतात पाठवली जात असल्याचं आयातदारांनी सांगितलं. त्यामुळं देशातील तुरीच्या तेजीला ब्रक लागला. मात्र तुरीचे दर एका भावपातळीवर स्थिर आहेत. सध्या म्यानमारच्या तुरीपेक्षा आफ्रिकेतून आयात केलेली तूर स्वस्त आहे. त्यामुळं यापासून निर्मित डाळीचे दरही कमी आहेत. याचाही दबाव देशातील तुरीच्या बाजारावर येतोय.

पुढील महिन्यापासून देशातील नवी तूर बाजारात येण्यास सुरुवात होईल. त्यानंतर बाजारात नव्या मालाची आवक हळूहळू वाढेल. त्यामुळं तुरीच्या दरांवरही दबाव येण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ही शक्यता लक्षात घेऊन स्टाॅकिस्ट आपल्याकडील साठा हळूहळू बाजारात आणत आहेत. मात्र देशातील आवक वाढत नाही तोपर्यंत तुरीचे दर टिकून राहण्यास मदत होत आहे.

दर पातळी

सरकार म्यानमारमधून आयात तुरीची ७ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करत आहे. हा दर सध्या सरकारकडे उपलब्ध असलेल्या साठ्याच्या तुलनेत खुपच जास्त आहे. तर आफ्रिकेतून आयात होणाऱ्या तुरीला ५ हजार ९८० रुपये दर दिला जात आहे. सरकारने आत्तापर्यंत १२ हजार टन आयात तूर खरेदी केली आहे.

काय दर राहू शकतात?

देशात यंदा तूर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळं सरकारनेही आयात तूर खरेदीवर जोर दिलाय. परिणामी शेतकऱ्यांची तूर बाजारात आली तरी दर तेजीत राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यंदा तूर सरासरी ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाऊ शकते, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com