Chana Sowing : पेरणीत गहू, मोहरीसह हरभऱ्याचीही आघाडी

देशातील रब्बीच्या पेरणीने यंदा चांगली गती घेतली आहे. देशात आतापर्यंत गेल्यावर्षीपेक्षा जवळपास चार टक्क्यांनी रब्बीचा पेरा जास्त झाला आहे. गेल्यावर्षी २ डिसेंबरपर्यंत ४२४ लाख हेक्टरवर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती.
Chana Sowing
Chana Sowing Agrowon

पुणेः देशातील रब्बीच्या पेरणीने (Rabi Sowing) यंदा चांगली गती घेतली आहे. देशात आतापर्यंत गेल्यावर्षीपेक्षा जवळपास चार टक्क्यांनी रब्बीचा पेरा (Chana Sowing) जास्त झाला आहे. गेल्यावर्षी २ डिसेंबरपर्यंत ४२४ लाख हेक्टरवर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती. मात्र यंदा याच तारखेपर्यंत ४४० लाख हेक्टरवर पेरा झाला आहे. यात गहू, मोहरी (Wheat Mustard Sowing) आणि हरभऱ्याची पेरणी वाढली. तर ज्वारीचा पेरा घटला आहे.

Chana Sowing
Chana Sowing : हरभऱ्याच्या ३३ हजार क्विंटल बियाण्यांची विक्री

देशात गव्हाची पेरणी जवळपास साडेपाच टक्क्याने जास्त झाली आहे. मागील हंगामात देशात गव्हाचे उत्पादन घटले होते. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढल्याने निर्यातही चांगली झाली. त्यामुळे देशात गव्हाचा साठा कमी झाला. परिणामी सरकारने गहू निर्यातबंदी केल्यानंतरही दरात तेजी आली.

Chana Sowing
Chana Sowing : नांदेडमध्ये सव्वादोन लाख हेक्टरवर हरभरा पेरणी

सध्या गव्हाला सरासरी ५ हजार ६०० ते २ हजार ९०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे चालू रब्बी हंगामात गव्हाचा पेरा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसर आजपर्यंत गव्हाचे लागवड क्षेत्र साडेपाच टक्क्यांनी जास्त आहे. गेल्यावर्षी २ डिसेंबरपर्यंत २०० लाख हेक्टरवर गव्हाचा पेरा झाला होता. मात्र यंदा क्षेत्र वाढून २११ लाख हेक्टरवर पोचले आहे.

Chana Sowing
Kabuli Chana Rate : काबुली हरभरा तेजीत; पेरणी वाढली

एकूण कडधान्याचा विचार करता पेरणीने गेल्यावर्षीपेक्षा जवळपास चार टक्क्याने आघाडी घेतली. ११३ लाख हेक्टरवर आतापर्यंत कडधान्याचा पेरा झाला. जो गेल्यावर्षी याच काळात १०९ लाख हेक्टर होता. तसेच एकूण तेलबियांचा विचार करता लागवड १० टक्क्यांनी वाढली आहे. गेल्यावर्षी ७५ लाख हेक्टरवर तेलबिया पिकांची लागवड झाली होती. तर यंदा २ डिसेंबरपर्यंत ८३ लाख हेक्टरवर तेलबिया पिकांची पेरणी झाली आहे.

भरडधान्याचा पेराही आतापर्यंत १२.४५ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्यावर्षी २ डिसेंबरपर्यंत २९ लाख हेक्टरवर ज्वारी, बाजरी, रागी, मका आणि बार्ली या पिकांची लागवड झाली होती. तर यंदा जवळपास ३३ लाख हेक्टरवर या पिकांचा पेरा झाला आहे.

हरभऱ्याची सरशी

मागील वर्षभर हरभरा दर दबावात होते. त्यामुळे यंदा हरभऱ्याचा पेरा कमी राहील, असे सांगितले जात होते. मात्र हरभऱ्याची पेरणीही तब्बल साडेपाच टक्क्यांनी वाढली आहे. गेल्यावर्षी २ डिसेंबरपर्यंत ७६ लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा होता. मात्र यंदा हरभरा पेरणीने वेग घेत ८० लाख हेक्टर क्षेत्र काबीज केले.

मोहरीची आघाडी

गेल्यावर्षी मोहरीला चांगला दर मिळाला होता. त्यामुळे यंदा मोहरीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज व्यक्त होत होता. त्यानुसार रब्बी हंगामात मोहरीने आघाडी घेतली आहे. मोहरीचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा जवळपास ११ टक्क्यांनी वाढला आहे. २ डिसेंबरपर्यंत देशात ७७ लाख हेक्टरवर मोहरीची लागवड झाली. गेल्यावर्षी याच दिवसापर्यंत ६९ लाख हेक्टरवर मोहरीची लागवड झाली होती.

ज्वारीची माघार

देशात यंदा परतीचा पाऊस चांगला झाला. अनेक शेतांमध्ये पाणी साचून होते. त्यामुळे पेरणीला उशीर झाला. ज्वारी उत्पादनात देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात यंदा ज्वारीचा पेरा कमी होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर देशात २ डिसेंबरपर्यंत जवळपास १७ लाख ८७ हजार हेक्टरवर ज्वारीची लागवड झाली. तर गेल्यावर्षी याच काळात १८ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्र ज्वारीखाली आले होते. आतापर्यंत ज्वारीचा पेरा गेल्यावर्षीपेक्षा जवळपास दीड टक्क्याने कमी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com