Wheat: बांगलादेशकडून गहू आयातीची निविदा रद्द

रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युद्धामुळं जागतिक पातळीवर गव्हाचा (Wheat) तुटवडा निर्माण झालाय. त्याचा सर्वाधिक फटका बांगलादेशला (Bangladesh) बसतोय. (Wheat Export ban India)
Wheat Export
Wheat ExportAgrowon

रशिया-युक्रेन (Russia-Ukraine) युद्धामुळं जागतिक पातळीवर गव्हाचा (Wheat) तुटवडा निर्माण झालाय. त्याचा सर्वाधिक फटका बांगलादेशला (Bangladesh) बसतोय. कारण बांगलादेश गहू आयातीवर (Wheat Import) अवलंबून आहे. त्यामुळे रशियाऐवजी गहू उत्पादक देशांकडून गहू आयातीसाठी बांगलादेश प्रयत्न करत आहे.

बांगलादेशने ५० हजार टन गहू खरेदीसाठी निविदा काढल्या होत्या. मात्र या निविदांवर सिंगापूरमधील केवळ एकाच निर्यातदारानं बोली लावली. त्यानुसार प्रतिटन ४७६ डॉलरने ही बोली लावली गेली. मात्र भारताच्या गहू आयातीच्या तुलनेत जास्तीचा दराने ही बोली लावल्यामुळे बांगलादेशने गहू आयातीची निविदा रद्द केली आहे. यापूर्वी गव्हाच्या वाढत्या दरामुळे बांगलादेशने तीन निविदा रद्द केल्या आहेत.

बांगलादेशला भारताकडून गव्हाची आयात करणं परवडतं. कारण वाहतूक रस्त्यामार्गे होत असल्याने खर्च कमी येतो. त्यामुळे बांगलादेशचे भारताच्या गव्हाकडे विशेष लक्ष आहे. चालू आर्थिक वर्षात बांगलादेशला ६२ लाख टन गव्हाची गरज आहे.

भारतातील गहू उत्पादनात उष्णतेच्या लाटेमुळे घट झाली. त्यामुळे केंद्र सरकारने मे महिन्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली. गव्हाच्या सरकारी खरेदीचं उद्दिष्ट्यही सरकारला गाठता आलेलं नाही. भारतीय अन्न महामंडळाने (Food Corporation Of India) गेल्यावर्षी ४४३ लाख टन गहू खरेदी केला होता. मात्र यंदा गव्हाच्या उत्पादनातील घट आणि जागतिक पातळीवर वाढलेल्या किंमतीमुळे सरकारी खरेदी १९० लाख टन झाली.

बांगलादेशची मात्र भारताच्या गव्हावर भिस्त आहे. जागतिक बाजारपेठेत भारतीय गव्हाला मागणी आहे. मात्र केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांनाही फटका बसतो आहे. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेनच्या युद्धानं गहू आयातदार देशही हैराण झाले आहेत. कारण या दोन्ही देशांतून जगातील सुमारे ३० टक्के गहू पुरवठा होतो.

केंद्र सरकारने यंदा गव्हासाठी किमान आधारभूत किंमत (हमीभाव) (MSP) प्रति क्विंटल २०१५ रुपये जाहीर केली आहे. मात्र जागतिक पातळीवर वाढलेल्या मागणीमुळे बाजारात गव्हाचे दर प्रति क्विंटल २४०० रुपयांवर पोहचले होते. अजूनही बाजारात गव्हाचे दर हमीभावपेक्षा अधिक आहेत. गव्हाला सध्या बाजारात सरासरी २०७७ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.

भारताच्या गहू निर्यात बंदीनंतर १७ मे रोजी शिकागो बॉर्ड ऑफ ट्रेडवर गव्हाचे फ्युचर्स १२.०८ डॉलरवरून ८.०२ प्रति बुशेलवर आले होते. दरम्यान, युक्रेनमधील धान्य रेल्वे आणि रस्ते मार्गाने इतर देशांमधील बंदरावर पाठवले जात आहे. त्यामुळे जागतिक गव्हाचा पुरवठा सुधारतोय

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com