GM Mohari : तेलबिया पिकांमध्ये जीएम वाणांची आवश्यकता का आहे?

देशात दरवर्षी खाद्येतलाचा वापर २५० लाख टनांच्या दरम्यान वापर होत असतो. खाद्यतेल वापरात सर्वाधिक वाटा पाम तेलाचा आहे. त्यानंतर सोयाबीन आणि मोहरी तेलाचा नंबर लागतो. तसेच आयातही पाम तेलाची अधिक असते.
soybean rate
soybean rate agrowon

पुणेः केंद्र सरकाच्या ‘सेंटर फॉर जेनेटिक मॅनिप्युलेशन ऑफ क्रॉप प्लांट' या संस्थेने जीएम मोहरीच्या वाणाच्या (GM Mustard Verity) प्रसारणाला परवानगी दिली. मात्र अंतिम परवानगी मिळणे अद्याप बाकी आहे. मोहरीच्या या वाणाला (Mustard Verity) अंतिम परवानगी मिळाल्यास तेलबिया उत्पादन (Oil seed Production) वाढीस मदत मिळेल, असा दावा केला जात आहे. असे झाल्यास भारताला आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत मिळेल.

देशात दरवर्षी खाद्येतलाचा वापर २५० लाख टनांच्या दरम्यान वापर होत असतो. खाद्यतेल वापरात सर्वाधिक वाटा पाम तेलाचा आहे. त्यानंतर सोयाबीन आणि मोहरी तेलाचा नंबर लागतो. तसेच आयातही पाम तेलाची अधिक असते. भारतात प्रामुख्याने अर्जेंटिना, ब्राझील, इंडोनेशिया, मलेशिया, रशिया आणि युक्रेन या देशांमधून खाद्यतेलाची आयात होत असते.

soybean rate
GM Mustard : जीएम मोहरीच्या पर्यावरणीय प्रसाराला ‘जीईएसी’ ची शिफारस

सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचीही आयात मोठ्या प्रमाणात होते. मागील वर्षी भारताने जवळपास १३१ लाख टन खाद्यतेलाची आयात केली. मात्र २०१६-१७ मध्ये सर्वाधिक १५० लाख टन खाद्येतलाची आयात करावी लागली. मागील वर्षी आयात झालेल्या एकूण खाद्यतेलात पाम तेलाचा वाटा जवळपास ४८ लाख टन होता. तर सोयाबीन तेलाची आयात २९ लाख टन झाली. सूर्यफूल तेलाची आयात १९ लाख टनांवर होती.

soybean rate
GM Crop Ban : जनुकीय चाचण्यांवर सरसकट बंदी नको

देशाला खाद्येतलासाठी आयातीवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर वाढल्याचा फटका भारताला बसत असतो. २०१८-१९ मध्ये भारताला खाद्यतेल आयातीवर ७४ हजार कोटी रुपये खर्च करावे लागले. मात्र २०१९-२० मध्ये हा खर्च ९५ लाख कोटींवर पोहोचला. २०२०-२१ मध्ये ११९ लाख कोटी आणि २०२१-२२ मधील खर्च १९० लाख कोटींवर पोहोचल्याचे जाणकारांनी सांगितले.

देशातील एकूण खाद्यतेल वापरापैकी जवळपास १४ ते १५ टक्के वाटा मोहरी तेलाचा असतो. मात्र मोहरी तेलाचे उत्पादन वापरापेक्षा कमी असते. त्यामुळे आयात केली जाते. मात्र जागतिक पातळीवर मोहरी तेलाचे उत्पादनही कमी आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा कमीच राहतो. देशात दरवर्षी साधारणपणे ३५ ते ३७ लाख टन मोहरी तेलाचा वापर होत असतो. देशात राजस्थान, हरियाना, पंजाब आणि मध्य प्रदेशात प्रामुख्याने मोहरीचे उत्पादन घेतले जाते.

दरवर्षी साधारणपणे ७० ते ७५ लाख हेक्टरच्या दरम्यान मोहरीची लागवड केली जाते. मात्र उत्पादन ३२ ते ३५ लाख टनांच्या दरम्यान राहते. तर आयात ५० ते ६० हजार टनांच्या दरम्यान होते. म्हणजेच मागणीच्या तुलनेत मोहरी तेलाचा पुरवठा कमीच असतो. भारताला मोहरी तेल निर्यात करणारे महत्त्वाचे देश युक्रेन आणि युएई. मागील वर्षी भारताने युक्रेनमधून जवळपास १५ हजार टन मोहरी तेलाची आयात झाली. तर यूएईमधून ३७ हजार टन मोहरी तेल भारतात आयात झाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com