Cotton Procurement : ‘सीसीआयची’ कापूस खरेदी बंद का?

खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) खुल्या बाजारातील कापूस खरेदी डिसेंबरमध्ये काही दिवस सुरू केली. परंतु खुल्या बाजारातील ही खरेदी मागील दीड महिन्यापासून बंदावस्थेत आहे.
Cotton Rate
Cotton RateAgrowon

Cotton Market News : जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (Cotton Corporation Of India) (सीसीआय) खुल्या बाजारातील कापूस खरेदी (Cotton Procurement) डिसेंबरमध्ये काही दिवस सुरू केली. परंतु खुल्या बाजारातील ही खरेदी मागील दीड महिन्यापासून बंदावस्थेत आहे.

खरेदीला प्रतिसाद मिळत नाही, असे कारण सांगून सीसीआयने खरेदी बंद केली. परंतु बाजारात व्यापारी, खासगी खरेदीदार शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. या स्थितीत सीसीआयनेदेखील खुल्या बाजारात येऊन कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Cotton Rate
Cotton Policy : कापसाची होळी करून केंद्र सरकारचा निषेध

सीसीआयने खानदेशात नंदुरबार येथे सर्वप्रथम खरेदी केंद्र सुरू केले होते. परंतु या काळात कापूस दरांवर दबाव वाढत गेला. यामुळे सीसीआयने कापूस दर कमी केले. यामुळे शेतकऱ्यांनी सीसीआयच्या खरेदी केंद्रात कापूस विक्री टाळली.

Cotton Rate
Cotton Market : कापूस बाजार या आठवड्यात कसा राहिला? 

सध्या शासन कुठेही खरेदी करीत नसल्याचा लाभ व्यापारी, खासगी खरेदीदार घेत आहेत. कापसाची कवडीमोल दरात खरेदीचा प्रयत्न ही मंडळी गावोगावी करीत आहे. सीसीआयने खरेदी सुरू केल्यास दर स्थिर राहतील.

सध्या खासगी खरेदीदार ७८०० ते ८१०० रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी करीत आहेत. सीसीआयने खरेदी सुरू केल्यास स्पर्धा तयार होईल. बाजारात पोकळी तयार होईल. यामुळे दर स्थिर राहतील, किंवा सुधारणादेखील दरात होवू शकते, अशा स्थितीत सीसीआयने खुल्या बाजारात येवून कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com