Soybean Rate : सोयाबीनचे दर का स्थिरावले?

जागतिक सोयाबीन बाजार काहीसा स्थिरावल्याचं दिसतंय. देशातही सोयाबीनच्या बाजारात संमिश्र चित्र होतं. काही बाजारात दर तुटले होते तर काही ठिकाणी दर स्थिर होते.
soybean rate
soybean rate agrowon

पुणेः जागतिक सोयाबीन बाजार (Soybean Market) काहीसा स्थिरावल्याचं दिसतंय. देशातही सोयाबीनच्या बाजारात संमिश्र चित्र होतं. काही बाजारात दर (Soybean Rate) तुटले होते तर काही ठिकाणी दर स्थिर होते. सोयाबीनच्या बाजार दरात सुधारणा होऊनही आवक कमी आहे. आज देशात सोयाबीनला सरासरी ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

soybean rate
Soybean MSP : हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी १५ केंद्र

देशातील बाजारात सोयाबीन दर एका भावपातळीभोवती मागील काही दिवसांपासून फिरत आहेत. सोयाबीनच्या दराने ६ हजार रुपयांचा टप्पा पार केल्यानंतर दर स्थिर होत आहेत. तर कमाल दरात क्विंटलमागे १०० रुपयांनी चढउतार होत आहेत. बाजार समित्यांमधील सरासरी दरही १०० ते २०० रुपयांनी कमी जास्त होताना दिसत आहे. आजही अनेक बाजारात सोयाबीनच्या दरात काहीशी नरमाई दिसली. तर काही ठिकाणी सोयाबीनचा बाजार स्थिर होता.

soybean rate
Soybean Rate : स्टॉक लिमिट हटविल्याने सोयाबीन दरात सुधारणा

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचे दर काहीसे नरमले होते. सोयाबीन आणि सोयातेलाच्या दरात काहीशी घट झाली तरी सोयापेंडचे दर किंचित सुधारले होते. सीबाॅटवर आज सोयाबनचे दर जवळपास ४ सेंटने कमी होऊन १४.३६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयातेलाच्या दरातही किंचित घट होऊन ७६ सेंट प्रतिपाऊंडवर स्थिरावले. तर सोयापेंडचे दर ४०७ डाॅलर प्रतिटनावर पोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंड काहीसे स्थिरावले असले तरी मागील आठवड्याच्या तुलनेत दरात घट झाली आहे.

कमाल दर

देशातील बाजारात सोयाबीनचे दर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुधारले आहेत. मात्र कमाल दर ६ हजार १०० रुपयांच्या पुढे जात नाहीत. एक-दोन बाजार समित्यांमध्ये दराने हा आकडा पार केला. मात्र तो टिकला नाही. दर पुन्हा ६ हजारांच्या आसपास येत आहेत. तर सोयाबीनचा सरासरी दरही काहीसा टिकून आहे. सोयाबीनचे दर ६ हजारांपर्यंत पोचल्यानंतर देशातून सोयाबीन आणि सोयापेंड निर्यातीचे करार कमी होत आहेत. त्यामुळं दर या भावपातळीपेक्षा जास्त वाढले नाहीत, असं अभ्यासकांनी सांगितलं.

आजची भावपातळी

आज देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ७०० रुपये दर मिळाला. तर कमाल दर ६ हजार २०० रुपये दोन बाजार समित्यांमध्ये मिळाला. आज मध्य प्रदेशातील दर ५ हजार ५०० ते ५ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान होते. तर राजस्थानमध्ये ५ हजार ४०० ते ६ हजार रुपये सोयाबीनला दर मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर आणि देशातील मागणी आ णि निर्यात पाहता सोयाबीन ५ ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो, त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com