Soybean Rate: देशातून सोयापेंड निर्यात का वाढतेय ?

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर तेजीत होते. त्यामुळं देशातही खाद्यतेल दराने उच्चांक गाठला होता. परिणामी सोयाबीन आणि मोहरीच्या दरानेही उसळी घतली होती.
Soybean import
Soybean importAgrowon

मागीलवर्षी सोयाबीनचे दर (Soybean Rate) तेजीत होते. खाद्यतेलाचे भाव (Edible Oil Rate) गगणाला भीडल्यानं सोयाबीनलाही उठाव मिळाला. मात्र सोयापेंड निर्यात (Soymeal Export) नगण्य होत होती. पण आता सोयाबीन निर्यातही (Soybean Export) वाढली आहे. ऑगस्ट महिन्यातील सोयापेंड निर्यात गेल्यावर्षीपेक्षा जास्त आहे. पण यंदा सोयापेंड निर्यात का वाढली? सोयापेंड निर्यातवाढीचा दरावर काय परिणाम होईल?

Soybean import
Soybean Oil Import : सोयाबीन तेल आयात आठ टक्क्यांनी वाढली

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर तेजीत होते. त्यामुळं देशातही खाद्यतेल दराने उच्चांक गाठला होता. परिणामी सोयाबीन आणि मोहरीच्या दरानेही उसळी घतली होती. सोयाबीन आणि मोहरीला हमीभावापेक्षा ८० ते ९० टक्के अधिक दर मिळाला. मात्र ही तेजी खाद्यतेलाच्या दरामुळं होती. तेलबियांचे दर वाढल्यामुळं आपसुकच पेंडेचेही दर वाढले. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड आणि मोहरी पेंडेचे दर भारतापेक्षा कमीच होते. त्यामुळं हंगाच्या सुरुवातीपासूनच सोयापेंड निर्यात कमीच राहीली. मोहरी पेंडेची निर्यात मात्र काहीशी वाढली होती.

Soybean import
GM Soybean : देशात जनुकीय परावर्तित सोयाबीनची मोठी खेप दाखल

मात्र मागील दोन महिन्यांपासून खाद्येतलाचे दर नरमले. सोयाबीन आणि मोहरीचेही दर कमी झाले. परिणामी पेंडही स्वस्त झाली. त्यामुळं सोयापेंड आणि मोहरीपेंड निर्यातीला आधार मिळाला. ऑगस्ट महिन्यातील तेलबिया पेंड निर्यात तब्बल ७१ टक्क्यांनी वाढली. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांमध्ये १५ लाख ३१ हजार टन तेलबिया पेंड निर्यात झाली. मागीलवर्षी याच काळातील निर्यात ही जवळपास ११ लाख टनांपर्यंत पोचली होती.

यंदा या पाच महिन्यांमध्ये १० लाख ८० हजार टन मोहरीपेंड निर्यात झाली. तर मागीलवर्षी याच काळातील मोहरीपेंड निर्यातीनं केवळ ५ लाख ४२ हजार टनांचा टप्पा गाठला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात मोहरीपेंडेचे दर ३५५ डाॅलर प्रतिटन होते. मात्र भारतानं २९५ डाॅलर प्रतिटनानं निर्यात केली. त्यामुळं दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आणि थायलंडसह इतर देशांनी भारतीय मोहरीपेंडेला पसंती दिली.

सोयापेंड निर्यातीतही मागील दोन महिन्यांमध्ये चांगली वाढ झाली. ऑगस्ट महिन्यात जवळपास १८ हजार टन सोयापेंड निर्यात झाली. जी मागीलवर्षीच्या ११ लाख टनांपेक्षा जास्त होती. भारतीय बाजारपेठेत सोयाबीनचे दर कमी झाल्यानंतर सोयापेंडही स्वस्त झाली. मार्च महिन्यात भारतीय सोयापेंडेचे दर ८८८ डाॅलर प्रतिटन होते, ते आता ५६० डाॅलरपर्यंत कमी झाले. त्यामुळं सोयापेंड निर्यातीला गती मिळतेय, असं साॅल्व्हेंट एक्सट्राक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियानं म्हटलंय.

सध्या भारतीय सोयापेंडेचे दर ५२ हजार ते ५३ हजार रुपये प्रतिटनांवर आहेत. जाणकारांच्या मते सोयापेंड ५४ हजार रुपये प्रतिटन असली तरी निर्यात होऊ शकते. सोयापेंड निर्यात वाढल्यास सोयाबीन दरालाही आधार मिळू शकतो. त्यामुळं वाढलेली सोयापेंड निर्यात सोयाबीन उत्पादकांच्याही पथ्यावर पडू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com