Chana Market : हरभरा बाजार दबावात का आहे?

देशातील बाजारात सध्या हरभरा भाव दबावात आहेत. नाफेडची खेरदीही जोमात सुरु आहे. पण सरकार यंदा कडधान्य बाजारावर दबाव ठेऊन आहे.
Chana Market
Chana Market Agrowon

Chana News : देशातील हरभरा उत्पादनात (Chana Production) यंदा २० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. तर सरकारने यंदा हरभरा उत्पादन विक्रमी १३६ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज जाहीर केला.

पण बाजारातील आवक पहता यंदा उत्पादन कमी असल्याचं दिसतं, असे व्यापारी सांगत आहेत. असे असतानाही हरभरा बाजारावर (Chana Market) गेल्यावर्षीपासून सरकारचा दबाव आहे.

मागील हंगामात नाफेडने विक्रमी २६ लाख टन हरभरा खरेदी केला होता. नंतर हा हरभरा कमी भावात टप्प्याटप्याने विकला. यामुळे खुल्या बाजारात हरभरा दर (Chana Rate) दबावात आले. नवा माल बाजारात येण्याच्या काळातही नाफेडची विक्री सुरुच होती. 

देशातील बाजारात सध्या हरभरा भाव दबावात आहेत. नाफेडची खेरदीही जोमात सुरु आहे. पण सरकार यंदा कडधान्य बाजारावर दबाव ठेऊन आहे.

सरकार कोणत्याही वेळी कोणताही निर्णय घेऊ शकते, अशी भीती सध्या बाजारात असल्याचं व्यापारी आणि प्रक्रियादार सांगत आहेत.  

यंदाही नाफेडने आतापर्यंत २० लाख २४ हजार टनांची खरेदी केली. मध्य प्रदेशात सर्वाधिक ७ लाख २७ हजार टनांची खरेदी झाली. तर महाराष्ट्रात ६ लाख ७७ हजार टन हरभरा खरेदी करण्यात आला.

गुजरातमध्ये सव्वातीन लाख टनांची तर राजस्थानमध्ये सव्वा लाख टनांची खरेदी झाली. गेल्याहंगामातील १५ लाख टन हरभरा शिल्लक आहे. म्हणजेच फक्त नाफेडकडे ३५ लाख टनांचा स्टाॅक आहे.

नाफेडची खरेदी अद्यापही सुरु आहे. नाफेडची खरेदी आणि उत्पादनातील घट तसेच इतर कडधान्याचे दर तेजीत असल्याने हरभऱ्यालाही आधार मिळेल, अशी शक्यता होती. पण तुरीचे दर तेजीत असल्याने सरकार कडधान्य बाजारावर लक्ष ठेऊन आहे. 

Chana Market
Chana Market : हरभरा बाजार दबावातच का आहे? भाव वाढतील का?

सरकारने व्यापारी, स्टाॅकिस्ट, प्रक्रियादार आणि आयातदारांना तुरीसह हरभरा स्टाॅकचीही माहिती देण्यास सांगितले आहे.

यामुळे सरकार यंदाही हरभरा भाव दबावातच ठेवण्याच्या मनसुब्यात असल्याची चर्चा आहे. तसेच नाफेडकडे हरभऱ्याचा मोठा स्टाॅक गेल्यावर्षीपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. नाफेड हा स्टाॅक पुढील काळात बाजारात आणण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षीप्रमाणे खुल्या बाजारातील दर दबावात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, अशीही चर्चा बाजारात आहे. त्यामुळे खुल्या बाजारात हरभरा भाव दबावात आहे. 

Chana Market
Chana market: हरभऱ्याचा बाजार दबावातच का आहे?

देशातील बाजारात सध्या हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

व्यापारी आणि स्टाॅकिस्ट तसेच प्रक्रियादार गरजेप्रमाणे खरेदी करत आहेत. सरकारच्या बेभरवशाच्या धोरणाचा दबाव हरभरा बाजारवर आहे.

पुढील काळातही पाऊसमान कसे राहते यावरून बाजाराची दिशा ठरेल, असे जाणकारांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com