Poultry : पोल्ट्री व्यवसाय का ठरतोय आतबट्ट्याचा ?

बाजारात सध्या ब्राॅयलरचा पुरवठा वाढला. मात्र ग्राहकांची मागणी कमी आहे. त्यामुळं जिवंत पक्षांच्या दरात म्हणजेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरात मोठी घट झाली. परिणामी पोल्ट्री उत्पादक अडचणीत आले.
Poultry
Poultry Agrowon

पुणेः बाजारात सध्या ब्राॅयलरचा पुरवठा (Supply Of Broiler) वाढला. मात्र ग्राहकांची मागणी कमी आहे. त्यामुळं जिवंत पक्षांच्या (Live Bird Rate) दरात म्हणजेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरात (Poultry Rate) मोठी घट झाली. परिणामी पोल्ट्री उत्पादक (Poultry Producer) अडचणीत आले. पण जिवंत पक्षांचे दर कमी झाले त्या ग्राहकांना चिकन (Chicken) मात्र त्या प्रमाणात स्वस्त मिळत नाही.

यंदाच्या उन्हाळ्यात ब्राॅयलर पक्षांना उचांकी दर मिळाला होता. वाढलेली मागणी आणि संतुलीत पुरवठा यामुळं बाजारात दर सुधारले होते. पण आता मात्र पोल्ट्री उत्पादनाचा खर्चही वसूल होत नाही. उन्हाळ्यात ब्राॅयलर पक्षाचे वजन सरासरी २ किलोपर्यंत होते. मात्र पोषक वातावरणामुळं पक्षांचं वजन ३ ते साडेतीन किलोपर्यंत वाढलं. त्यामुळं बाजारात पुरवठा दाटला. त्यातच आषाढी एकादशी, बकरी ईद यामुळं किरकोळ मागणी कमी झाली. त्याचा परिणाम दरावर झाला. आज ब्राॅयलर पक्षाचे शेतकऱ्यांना मिळणारा दर ६५ रुपये प्रतिकिलो होता. मात्र उत्पादन खर्च सरासरी किलोमागे ९० रुपयांपर्यंत येतो. म्हणजेच पोल्ट्री उत्पादकांना किलोमागे २५ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

Poultry
Poultry : पक्ष्यांमधील आजारांवर वेळीच करा उपचार

बाजारात चिकनची मागणी कमी होऊन दर पडले. मात्र खाद्याचे दर आहे त्याच पातळीवर आहेत. सोयापेंडचे किलीचे दर ६० ते ६२ रुपयांवरून कमी होऊन ५३ ते ५४ रुपयांपर्यंत कमी झाले. मात्र मक्याचे दर १८ रुपयांवरून २५ रुपयांपर्यंत पोचले. इतरही खाद्याचा दर वाढलेला आहे. पोल्ट्री खाद्याचा किलोचा दर ४२ रुपये प्रतिकिलोवर आहे. एक पक्षी २ किलोचा होण्यासाठी चार किलो खाद्य लागते, असे उत्पादकांनी सांगितलं. चार किलो खाद्याचा खर्च १८० रुपये होतो. तर उत्पादकांना १३० रुपये मिळतात. म्हणजेच दोन किलोच्या पक्षामागं ५० रुपये तोटा होता, असं अकोट येथील पोल्ट्री उत्पादक शुभम महाले यांनी सांगितलं.

Poultry
Poultry : ब्रॉयलर पक्षी संगोपनातून अर्थकारणाला गती

मागणी कमी असल्याने अनेक कंपन्या पक्षाचे वजन तीन ते साडेतीन किलोपर्यंत वाढू देतात. त्यामुळे बाजारात पुरवठा वाढला. मात्र या पक्षांना ग्राहकांची पसंती मिळत नाही. चवीत बदर होतो. त्यामुळं पक्षांचे वजन सरासरी २ किलोपर्यंत वाढू देणे फायदेशीर आहे. तसेच चिकनची मागणी आषाढी एकादशी आणि श्रावण महिना या काळात कमी होते. हे लक्षात घेऊन पुरवठ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. कमी मागणीच्या काळात कमी पुरवठा आणि जास्त मागणीच्या काळात पुरवठा वाढवल्यास ही परिस्थिती उद्भणार नाही.

ब्राॅयलर दराची सध्याची जी स्थिती आहे, त्याला उद्योगाचे नियोजन जबाबर असल्याचं, जाणकारांनी सांगितले. बाजारातील मागणीचा विचार न करणे, पक्षांचे वजन वाढू देणे आणि अनियंत्रित पुरवठा यामुळे ही वेळ आली. बाजारात ब्राॅयलर पक्षाचे दर १२५ रुपयांवर होते तेव्हा ग्राहकांना चिकन २६० रुपयाने मिळत होते. मात्र ब्राॅयलरचा दर ५० रुपयांपर्यंत कमी झाला होता. म्हणजेच दरात निम्मापेक्षा अधिक घट झाली. पण ग्राहकांसाठी चिकन निम्माने स्वस्त झाले नाही. ग्राहकांना पुण्यात आजही २४० रुपये किलोने चिकन घ्यावे लागते. म्हणजेच या परिस्थितीचा फायदा व्यापारी आणि विक्रेते घेत असल्याचंही उत्पादकांनी सांगितलं.

ब्राॅयलरचे दर कमी झाल्यानंतर विक्रेत्यांनीही त्याच प्रमाणात दर कमी करावेत. चिकन स्वस्त झाल्यास मागणी वाढेल. त्यामुळं वाढलेल्या पुरवठ्याचा दबाव काहीसा कमी होईल, असंही उत्पादकांनी सागितलं.

पुरवठा वाढल्यानंतर ब्राॅयलरचा दर जास्तीत जास्त ९० रुपयांपर्यंत कमी होईल, असा अंदाज होता. मात्र दराने ४५ ते ५० रुपयांची निचांकी पातळी गाठली. मागणी कमी झाली मात्र पुरवठ्याचं नियोजन नाही. त्यामुळं दर घसरले. आठवडाभरात दरात वाढ अपेक्षित आहे. मात्र उत्पादन खर्चाऐवढे दर होण्यास आणखी काही वेळ लागेल.
अनिल फडके, पोल्ट्री व्यावसायिक, नाशिक
पोल्ट्री खाद्याचे दर वाढलेलेच आहेत. मात्र उत्पादन वाढल्यानं दर कमी झाले. मोठ्या कंपन्यांचं उत्पादनावर नियंत्रण नाही. त्याचा फटका सर्वांनाच बसतोय. त्यामुळं सरकारनं वैयक्तिक पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्यांना मदत करावी.
शुभम महाले, पोल्ट्री व्यावसायिक, अकोट, जि. अकोला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com