Food Grain
Food GrainAgrowon

Food Grain : कमी पावसामुळे धान्य उत्पादन कमी होणार?

देशात जुलै महिन्यात अनेक राज्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस

पुणेः देशात माॅन्सून (Monsoon) दाखल झाल्यानंतर जून महिन्यात पावासाचं प्रमाण कमी राहीलं. जुलै महिन्यात पावासानं सरासरी ओलांडली. पण पावसाचं प्रमाण असमान होतं. त्यामुळं भाताची लागवड (Paddy Cultivation) कमी झाली. खरिपात आतापर्यंत धान्य पिकांचा पेरा (Grain Grop Sowing) ४.६ टक्क्यांनी कमी झाला. त्याचा परिणाम उत्पादनावर (Food Grain Production) होऊ शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.

Food Grain
Food Crisis : जागतिक पातळीवरील अन्नधान्य संकटाला जबाबदार कोण ?

भारतातील शेती उत्पादनासाठी खरिप हंगाम महत्वाचा असतो. त्यातच खरीप माॅन्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. माॅन्सून दाखल झाल्यानंतर जून महिन्यात पेरण्या होतात. पिकांच्या वाढीसाठी जुलै महिन्यातील पाऊस महत्वाचा असतो. मात्र यंदा माॅन्सून दाखल झाल्यानंतर देशात जून महिन्यात पाऊस कमी झाला. जुलै महिन्यात पाऊस चांगला बरसला. मात्र देशातील विविध भागांत पावसाचं प्रमाण कमी जास्त आहे. आत्तापर्यंत देशात सरासरीपेक्षा ११ टक्के अधिक पाऊस झाला, असं हवामान विभागानं सांगितलं.

Food Grain
GST : अन्नधान्य, खाद्य पदार्थांवरील जीएसटीला विदर्भ चेंबरचा विरोध

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात सरासरीपेक्षा ६८ टक्के कमी पाऊस झाला. तर झारखंडमध्ये पावसातील तूट ५१ टक्के आहे. तसचं बिहारमध्ये ४९ टक्के, मनिपूरमध्ये ४० टक्के, त्रिपुरामध्ये ३० टक्के, पश्चिम बंगालमध्ये २७ टक्के, दिल्लीत २२ टक्के, मिझोराम राज्यात २१ टक्के, नागालॅंडमध्ये १८ टक्के आणि उत्तराखंडमध्ये १६ टक्के कमी पाऊस झाला. ही सर्व राज्ये खरिपातील महत्वाची धान्ये उत्पादक आहेत. या राज्यांत जुलै महिन्यात कमी झाल्याने पेरण्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पाऊस कमी झालेल्या राज्यांत भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे देशात भात लागवड आत्तापर्यंत कमी झाली. यंदा गेल्यावर्षीपेक्षा १७ टक्क्यांनी भात लागवड कमी झाली. यात प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहारसह पाऊस कमी पडलेल्या राज्यांचा समावेश आहे. यंदा कडधान्याचा पेरा अधिक झाला. मात्र तुरीची लागवड २० टक्क्यांनी कमी राहिली. मुगाचीही पेरणी वाढली. त्यासोबत भरडधान्य, तेलबिया आणि कापसाचीही लागवड अधिक झाली. मात्र एकूण धान्याचा पेरा ४.६ टक्क्यांनी कमी झाला.

जुलै महिन्यात अनेक भागांत पावसाचं प्रमाण कमी राहीलं. मात्र ऑगस्टमध्ये पाऊस चांगला झाला तर पेरण्या पुढील महिन्यातही होऊ शकतात. परंतु सध्या असलेलं पावसाचं असमान वितरण पुढील महिन्यातही कायम राहिल्यास देशातील धान्य उत्पादनात घट होऊ शकते. विशेषतः तांदळाचं उत्पादन कमी राहील. असं झाल्यास तांदळाच्या दरात वाढ होऊ शकते, असं जाणकारांनी सांगितलं.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com