Cotton Price: कापसाचे दर घसरल्याने यंदा पेरा घटेल ?

जागतिक आणि देशांतर्गत कापसाच्या किमती (Cotton Price) अनुक्रमे २० आणि १० टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्यामुळे कापसाचे दर सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत. (Cotton Rate Downfall)
Cotton Price
Cotton PriceAgrowon

जागतिक आणि देशांतर्गत कापसाच्या किमती (Cotton Price) अनुक्रमे २० आणि १० टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्यामुळे कापसाचे दर सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्या आहेत. सूत (Staple) आणि कापसाच्या इतर उत्पादनाची (Cotton Product) मागणी घटली (Demand Increase) आहे. त्यामुळे खरेदीदारांनी हात आखडता घेतला आहे.

जागतिक बाजारपेठेत कापसाच्या दरात उतरता कल आहे. न्यूयॉर्क येथील इंटर कॉन्टिनेंटल एक्सचेंज (आयसीइ) येथेही कापसाच्या वायद्यांत घसरण झाली. गेल्या आठवड्यातच कापसाचे दर २३ टक्क्यांनी घरसले.

अमेरिकी डॉलरची मजबूत स्थिती, जागतिक मंदीचे सावट आणि कापसाच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज यामुळे कापसाच्या दरात घट दिसून येत आहे. परंतु कापसात विक्रमी तेजी आल्यानंतर ही घट अपेक्षितच होती. आगामी हंगामात मंदीचे लक्षण म्हणून याकडे पाहू नये, असे बाजारविश्वेषकांनी सांगितले.

भारतात सध्या चांगल्या गुणवत्तेच्या कापसाला प्रति कॅण्डी ९० हजार रुपये दर मिळत आहे. तर मध्यम ते खराब दर्जाच्या कापूस कॅण्डीचे दर ७५ हजाराच्या जवळपास आहेत. मात्र बाजारात चांगल्या प्रतीचा कापूस उपलब्ध नसल्याचे व्यापारी सांगतात. मल्टी कमोडीटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) कापूस वायद्यात घसरण दिसून आली.

यार्नच्या किमती गेल्या महिन्यात १० टक्क्यांनी घसरल्या आहेत. ३० सीसीएच कापूस यार्नचा दर प्रतिकिलो ३६०-३७० रुपये आहे. मागच्या महिन्यात हाच दर प्रतिकिलो ४१०-४१५ रुपये होता. मागणी आणि पुरवठ्याचे संतुलन साधण्यासाठी सूतगिरण्या कमी उत्पादन घेत आहेत, अशी माहिती या क्षेत्रातील जाणकारांनी दिली.

दरम्यान, कापसाच्या दरात घसरण होत असल्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत कापसाच्या शुल्कमुक्त आयातीत वाढ होऊ शकते. आयात २५ लाख कापूस गाठींवर पोहचू शकते, अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते, ९ लाख कापूस गाठीची आयात झाली आहे.

अजून १० लाख कापूस गाठींचे करार करण्यात आले आहेत. एक कापूस गाठ १७० किलोची असते. केंद्र सरकारने शुल्कमुक्त आयातीला परवानगी देण्याची मुदत किमान ३१ डिसेंबरपर्यंत वाढवावी, अशी मागणी साऊथ इंडियन मिल्स असोसिएशनकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, देशातील स्थानिक बाजारात कापसाचे सरासरी दर प्रति क्विंटल १०,६०३ रुपये आहेत. केंद्र सरकारने यंदा कापसाला प्रति क्विंटल ६०८० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. कापसाच्या दरातील ताज्या घसरणीचा परिणाम कापूस लागवडीवर होणार नसल्याचे व्यापारी सांगत आहेत.

एकट्या गुजरातमध्ये कापूस लागवड क्षेत्रात २०-२५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या हंगामाप्रमाणेच यंदाही कापसाचे दर मजबूत राहतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com