Soybean Rate : सोयाबीनचे दर आणखी कमी होणार का?

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील पाच दिवसांमध्ये सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडचे दर नरमले होते. पातेलाचे दरही मागील पाच दिवसांमध्ये कमी झाले आहेत.
Soybean Rate
Soybean RateAgrowon

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात मागील पाच दिवसांमध्ये सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडचे दर (Soybean Rate) नरमले होते. पातेलाचे दरही मागील पाच दिवसांमध्ये कमी झाले आहेत. तर देशातील बाजारात सोयाबीनच्या दरात (Soybean Market Rate) क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची तूट दिसून आली. पण सोयाबीनच्या दरात जास्त घट होणार नाही, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Soybean Rate
Soybean Rate : हिंगोलीत सोयाबीनला सरासरी ५५५० रुपये दर

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर जगात अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती. याचा मोठा फटका सर्वच देशांना सहन करावा लागला. कोरोनाच्या जोखडातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या जगाला या युध्दामुळं महागाईला सामोरं जावं लागलं. त्याच्या खुणा आजही जागतिक अर्थव्यवस्थेवर दिसत आहेत.

अलिकडेच रशियाने युक्रेनमधून अन्नधान्याची निर्यात करण्यास परवानगी दिल्यानंतर सर्वकाही सुरळीत होईल, असं वाटत होतं. पण युक्रेनने आपल्या लष्करी तळांवर हल्ला केल्याचं सांगत रशियाने निर्यातीचे मार्ग बंद केले होते. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलासह, गहू आणि मक्याचे दर वाढले होते. पण आता पुन्हा रशियाने युक्रेनमधून निर्यातीसाठी मार्ग खुले करण्यास सहमती असल्याचे सांगितले.

Soybean Rate
Soybean Rate : सोयापेंड निर्यातवाढीचा शेतकऱ्यांना फायदा

युक्रेनमधून सूर्यफुल तेलाची निर्यात पुन्हा सुरु होणार आहे. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात मागील आठवडाभरापासूनच नरमाई आली आली होती. पामतेलाचे दर नोव्हेंबरच्या सुरुवातीला ४ हजार ३२२ रिंगीट प्रतिटनावर पोचले होते. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे. ते आता ३ हजार ८२८ रिंगीटवर आले आहेत. मागील पाच दिवसांमध्येच पामतेलाचे दर १५५ रिंगीटने कमी झाले. पामतेलाचे दर कमी झाल्याचा परिणाम सोयातेलवरही झाला. सोयातेलाचे दर मागील पाच दिवसांमध्ये सोयातेलाचे दर ७७ सेंट प्रतिपाऊंडवरून ७०.३२ सेंटपर्यंत कमी झाले.

आंतरराष्ट्रीय बाजार

खाद्यतेलाचे दर कमी झाल्याचा परिणाम सोयाबीनच्या आंतरराष्ट्रीय बाजारावर झाला. १६ नोव्हेंबरला सोयाबीनचे वायदे १४.५६ डाॅलर प्रतिटनाने झाले होते. मात्र ते आज १४.२० डाॅलर प्रतिटनांपर्यंत घसरले. चीनच्या मागणीचा आधार आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला मिळत आहे. मात्र पामतेलातील चढउताराचा परिणाम सोयाबीन दरावर जाणवत आहे.

सध्याची दरपातळी

आंतरराष्ट्रीय बाजारातील सर्व घडामोडींचा परिणाम देशातील सोयाबीन दरावरही जाणवला. मागील पाच दिवसांपासून सोयाबीनचे दर कमी जास्त होत आहेत. १६ नोव्हेंबरच्या तुलनेत आज बहुतेक बाजार समित्यांमधील दर क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांनी नरमले होते. आज देशातील बहुतेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.

दर आणखी घसरणार?

सध्या सोयाबीनचे दर नरमले असले तरी दरात जास्त घट होणार नाही. सोयाबीनला यंदाच्या हंगामात सरासरी किमान ५ हजार ते कमाल ६ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com