Soybean Market: पामतेल आयात आठ महिन्यांतील निचांकी पातळीवर; सोयाबीनला आधार मिळेल का?

आंतरराष्ट्रीय बाजारात घटलेले दर आणि केंद्र सरकारने कमी केलेले आयातशुल्क, यामुळं देशात ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात खाद्यतेलाची आयात वाढली होती.
Soybean Market
Soybean MarketAgrowon

Soybean Market Update पुणेः भारतात मागील महिन्यांपासून खाद्यतेलाची आयात (Edible Oil Import) वाढलेली होती. त्याचा दबाव सोयाबीनसह तेलबिया बाजारावर (Soybean Market) दिसत होता.

पण देशात खाद्यतेलाचा साठा (Edible Oil Stock) वाढल्याने फेब्रुवारी महिन्यात पामतेलासह सोयातेल आणि सूर्यफुल तेलाची आयात (Sunflower Oil Import) कमी झाली.

पामतेलाची आयात आठ महिन्यांतील निचांकी पातळीवर पोचल्याचे वृत्त राॅयटर्स या वृत्त संस्थेने दिले.

आंतरराष्ट्रीय बाजारात घटलेले दर आणि केंद्र सरकारने कमी केलेले आयातशुल्क, यामुळं देशात ऑक्टोबर ते जानेवारी महिन्यात खाद्यतेलाची आयात वाढली होती. परिणामी देशात खाद्यतेलाचा साठा वाढला.

साठ्यातील खाद्यतेल विक्रीसाठी रिफायनरिंनी फेब्रुवारी महिन्यात खाद्यतेल आयात केली, अशी माहिती खाद्यतेलाच्या पाच डिलर्सनी सांगितल्याचं वृत्त राॅयटर्स या वृत्तसंस्थेने दिले.

भारत पामतेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे. फेब्रुवारी महिन्यात पामतेलाची आयात जानेवारीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी राहूल गेल्या आठ महिन्यांतील निचांकी पातळीवर पोचल्याचे आयातदारांनी सांगितले. भारताने पामतेल आयात कमी केल्याचा दबाव दरावर येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भारतात मागील काही महिन्यांमध्ये खाद्यतेल आयात वाढली होती, असे जीजीएन रिसर्चचे राजेश पटेल यांनी राॅयटर्सला सांगितले.

खाद्यतेल वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने फेब्रुवारी महिन्यात ५ लाख ८६ हजार टन खाद्यतेलाची आयात केली. फेब्रुवारीतील ही आयात जून २०२२ नंतरची सर्वात कमी आहे.

Soybean Market
Soybean Market : शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री कमी केली; दरात काहिशी सुधारणा

सोयातेलाची आयात ७.३ टक्क्यांनी कमी राहून ३ लाख ४० हजार टनांपर्यंत कमी झाली. तर सूर्यफुल तेलाची आयात ६७ टक्क्यांनी घटून १ लाख ५० हजार टनांपर्यंत घटल्याचं डिलर्सनी सांगितले.

मागील महिन्यात सोयातेल आणि सूर्यफुल तेलाच्या तुलनेत पामतेलाच्या दरातील पतळ टनामागं २०० डाॅलरपर्यंत कमी झाली होती. डिसेंबरपर्यंतच्या तिमाहित पडतळ ५०० डाॅलरवर होती. पण आता पामतेलाच्या दराला आधार मिळू शकतो, असे सनविन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बाजोरिया यांनी दिली.

Soybean Market
Soybean Rate : सुर्यफूल तेलाच्या आयात बंदीने सोयाबीनच्या दराला आधार मिळणार ?

पामतेल आयातवाढीची शक्यता

भारताने १ एप्रिलपासून कच्चे सोयातेल आणि सूर्यफुल तेल आयातीवर शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला. यामुळं सोयातेलाची आयात कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच फेब्रुवारीत खाद्यतेल आयात घटल्यामुळं बाजाराला आधार मिळू शकतो. यामुळं सोयाबीन आणि मोहरी तेलाचेही दर सुधारु शकतात.

सोयाबीनची दरपातळी

सध्या देशात सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. सोयाबीनला आतापर्यंत सोयापेंडकडून आधार मिळत होता. पण पुढील काळात सोयातेलाकडूनही आधार मिळण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळं सोयाबीनचे दर सुधारु शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

ऑक्टोबर ते जानेवारी या काळात भारतात पामतेलाची आवक वाढली होती. आयात वाढूनही मागणी मात्र कमी राहिली. यामुळे देशातील रिफायनरिंना फेब्रुवारीत आयात कमी करावी लागली.

- राजेश पटेल, जीजीएन रिसर्च

भारताने १ एप्रिलपासून कच्चे सोयातेल आणि सूर्यफुल तेलाची शुल्कमुक्त आयात बंद केली. यामुळे पुढील काळात पामतेलाला आधार मिळू शकतो.

- संदीप बाजोरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी, सनविन ग्रुप

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com