पुढील तीन हंगामामध्ये गव्हाची टंचाई भासणार ?

जगातील एकूण गव्हापैकी ३० टक्के गहू पुरवठा रशिया आणि युक्रेनमधून होतो. मात्र युद्धामुळे युक्रेनमधील उत्पादन आणि निर्यात मंदावली आहे.
पुढील तीन हंगामामध्ये गव्हाची टंचाई भासणार ?
Wheat Production Agrowon

रशियाच्या युक्रेनवरील (Russia-Ukraine) आक्रमणामुळे जागतिक बाजारात (Global Market00 महागाईचा भडका उडाला आहे. जगातील एकूण गव्हापैकी ३० टक्के गहू पुरवठा (Wheat Provider) रशिया आणि युक्रेनमधून होतो. मात्र युद्धामुळे युक्रेनमधील उत्पादन आणि निर्यात मंदावली आहे. "या आक्रमणामुळे पुढील तीन हंगामामध्ये जागतिक पातळीवर गव्हाची टंचाई निर्माण होईल. ज्यामुळे गव्हाच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहचतील." अशी भीती युक्रेनचे कृषी मंत्री मायकोला सोलस्की यांनी व्यक्त केली आहे.

युक्रेनच्या कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार, रशियन आक्रमणामुळे युक्रेनमधील २.४ दशलक्ष हेक्टर जमीन लागवडीविना पडून आहे. त्याचा फटकाही युक्रेनला सोसावा लागत आहे. आजवर युक्रेनमधील ४२ हजार मेंढ्या आणि मेंढ्या, ९२ हजार गाई आणि २ लाख ५८ हजार डुकर ५.७ दशलक्ष कोंबड्या या युद्धामध्ये मारल्या गेल्या आहेत.

सेंटर फॉर फूड अँड लँड युज रिसर्चचे तज्ज्ञ रोमन नेटर यांच्या मते, "रशियन आक्रमणामुळे केवळ शेतमालाच्या मुक्त निर्यातीवर परिणाम झाला नाही तर जगभरातील ४०० दशलक्ष लोकांच्या अन्न सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे."

युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात तेलबिया आणि अन्नधान्य पिकांचं उत्पादन होतं. मात्र २४ फेब्रुवारीपासून रशियाने सुरू केलेल्या आक्रमणामुळे युक्रेनची निर्यात घसरली. कारण रशियाने युक्रेनमधील काळ्या समुद्रातील निर्यात मार्ग बंद केले. त्यामुळे युक्रेन रेल्वे, नदी आणि रस्त्यावरून निर्यात करण्याचा प्रयत्न करतो आहे.

दरम्यान, या युद्धामुळे जागतिक बाजरातील धान्य, खाद्य तेल खत आणि उर्जेच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com