Dairy Summit: भारतात सप्टेेंबरमध्ये जागतिक दुग्ध परिषद

भारत दूध उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या भारताचे वार्षिक दूध उत्पादन २१० दशलक्ष टन आहे. परंतु भारताची दूध उत्पादकता मात्र खूपच कमी आहे.
Dairy Summit
Dairy SummitAgrowon

नवी दिल्ली येथे १२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर या कालावधीत जागतिक दुग्ध परिषद (International Dairy Summit) आयोजित करण्यात आली आहे. इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन (International Dairy Federation) या परिषदेची आयोजक आहे. या परिषदेमध्ये ४० हून अधिक देशांतील सुमारे दीड हजार प्रतिनिधी सहभागी होतील. भारताला दुधाळ जनावरांची उत्पादकता (Productivity Of Milch Animal) वाढवण्यासाठी या परिषदेतून दिशा मिळेल, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

Dairy Summit
Indian Dairy Association: आयडीएच्या अध्यक्षपदी आर.एस. सोढी

भारत दूध उत्पादनात (Milk Production) जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या भारताचे वार्षिक दूध उत्पादन २१० दशलक्ष टन आहे. परंतु भारताची दूध उत्पादकता मात्र खूपच कमी आहे. प्रति जनावर दूध उत्पादन म्हणजे दुधाळ जनावरांची उत्पादकता. दूध उत्पादकतेत भारत अनेक विकसित देशांच्या तुलनेत खूपच पिछाडीवर आहे. या परिषदेतून उत्पादकतेच्या प्रश्नावर ठोस तोडगा काढण्यासाठी बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे (NDDB) अध्यक्ष मीनेश शाह म्हणाले, “आम्ही दुधाळ जनावरांची उत्पादकता वाढावी यासाठी सातत्याने काम करत आहोत. भारत हा सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे, कारण आपल्याकडे जनावरांची संख्या सर्वाधिक आहे. पण प्रति जनावर दूध उत्पादन प्रगत देशांच्या तुलनेत कमी आहे. आपण सामुहिक प्रयत्नातून उत्पादकता वाढवायला हवी.”

Dairy Summit
Dairy Sector: डेअरी क्षेत्रामुळे ग्रामीण अर्थकारणास चालना: नरेंद्र मोदी

"मागील काही वर्षांत भारताच्या डेअरी क्षेत्राने उत्पादकता सुधारण्यात उल्लेखनीय यश मिळविले आहे. ही प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याची गरज आहे," असे शाह म्हणाले. भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी डेअरी क्षेत्र हे सर्वात महत्त्वाचे आहे. आपल्याकडे दुध उत्पादन घेणारे लहान शेतकरी आहेत. प्रत्येकाकडे सरासरी तीन-चार दुधाळ जनावरे असतात. विकसित देशांमध्ये मात्र प्रत्येक डेअरी फार्ममध्ये सरासरी दोनशे ते चारशे दुधाळ जनावरे असतात. भारतातील लहान शेतकरी डेअरी अर्थव्यवस्थेचा आधार कसे बनले आहेत, ते दाखवण्याची संधी या परिषदेच्या माध्यमातून मिळेल, असे शाह यांनी सांगितले.

अमूल (गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ) आणि नंदिनी (कर्नाटक सहकारी दूध उत्पादक महासंघ) हे या परिषदेचे मुख्य प्रायोजक आहेत. `अमूल`चे व्यवस्थापकीय संचालक आर एस सोढी म्हणाले की, या परिषदेमध्ये चारशे दुग्ध उत्पादक शेतकरी सहभागी होतील. तर `नंदिनी`चे व्यवस्थापकीय संचालक बी सी सतीश म्हणाले की, पुढील पिढीला डेअरी उद्योगात यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन देणारे व्यासपीठ या परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध होईल.

एनडीडीबीच्या आकडेवारीनुसार, भारताचे संघटित क्षेत्राकडून होणारे दैनंदिन दूध संकलन सुमारे १२ कोटी लिटर आहे. त्यापैकी सुमारे सहा कोटी लिटर दूध सहकारी संस्थांकडून आणि उर्वरित दूध खासगी कंपन्यांकडून संकलित केले येते. भारत ४८ वर्षांनंतर जागतिक दुग्ध परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com