Spice congress: जागतिक मसाला संमेलन फेब्रुवारीत नवी मुंबईत

स्पाइसेस बोर्ड इंडियाच्या वतीने आयोजित केले जाणारे हे द्वैवार्षिक संमेलन जगभरातील मसाला उद्योगांना एकत्र येऊन या क्षेत्रातील समस्या आणि अपेक्षा याविषयी चर्चा करण्यासाठीचे प्रमुख व्यासपीठ आहे.
Spices
SpicesAgrowon

मसाला क्षेत्रातील सर्वात मोठे 14 वे जागतिक मसाला संमेलन (Global Spice Congress) 16 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्रातील नवी मुंबईच्या सिडको प्रदर्शन आणि परिषद केंद्र येथे भरणार आहे. हे संमेलन भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या स्पाइसेस बोर्ड (Spices Board) तर्फे आयोजित करण्यात आले आहे.

या संमेलनात 50 पेक्षा जास्त देशांतील एक हजाराहून जास्त प्रतिनिधी सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. स्पाइसेस बोर्ड इंडियाच्या वतीने आयोजित केले जाणारे हे द्वैवार्षिक संमेलन जगभरातील मसाला उद्योगांना एकत्र येऊन या क्षेत्रातील समस्या आणि अपेक्षा याविषयी चर्चा करण्यासाठीचे प्रमुख व्यासपीठ आहे.

Spices
Spices Production : अस्सल वऱ्हाडी मसाला उद्योगाने उंचावले अर्थकारण

या संमेलनात मसाला उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन, गुणवत्ता आणि सुरक्षितता, व्यापार आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन यांच्याबद्दल या विस्तृत चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. तसेच या संमेलनात मसाल्याचे प्रमुख आयातदार देश, G-20 सदस्य देशांची व्यापार मंत्रालये, निर्यात प्रोत्साहन संस्था यांची भारतीय मसाला उद्योग जगताशी चर्चा होणं अपेक्षित आहे.

Spices
Spices : शेतकरी कंपनीद्वारे मसाल्यांना दिली बाजारपेठ

यावेळी स्पाइसेस बोर्ड इंडियाचे सचिव डी.साथियन म्हणाले की, "डिसेंबर 2022 ते नोव्हेंबर 2023 या दरम्यान G-20 देशांचे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान यावेळी भारताकडे आहे. त्यामुळे G-20 देशांचे आणि भारताचे व्यापारविषयक बंध अधिक मजबूत व्हावेत या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे."

महत्त्वाच्या आयातदार देशांची नियामकीय प्राधिकरणे आणि G-20 सदस्य देशांचे व्यापार आणि उद्योगमंत्र्यांची संघटना या संमेलनात सहभागी होऊन संवाद साधतील. 1990 मध्ये पहिल्यांदा हे संमेलन भरलं होतं. त्यानंतर गेल्या तीस वर्षांत 13 संमेलने पार पडली. जगभरातील मसाला भागधारकांना या संमेलनाचा फायदा झाला असून यामुळे व्यवसायाच्या संधींना चालना मिळते. आणि व्यापारी संबंध दृढ व्हायला मदत झालीय.

या संमेलनात व्यावसायिक सत्रांव्यतिरिक्त भारतीय मसाला उद्योगातील उत्पादनं, औषधी/आरोग्य क्षेत्रासाठी महत्वपूर्ण अशी मसाल्याची उत्पादनं यांचे सुद्धा प्रदर्शन असते. अधिक माहितीसाठी www.worldspicecongress.com या संकेतस्थळाला भेट द्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com