दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिप
औरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास २४५ मंडळांत सोमवार (ता. १६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. तुरळक, हलका तर चार-दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असलेल्या या पावसाची रिपरिपही काही भागात सुरू होती.
औरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास २४५ मंडळांत सोमवार (ता. १६) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पावसाने हजेरी लावली. तुरळक, हलका तर चार-दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असलेल्या या पावसाची रिपरिपही काही भागात सुरू होती.
सोमवार सकाळपर्यंतच्या पावसानुसार नांदेड जिल्ह्यातील तीन, उस्मानाबादमधील एक, व हिंगोली जिल्ह्यातील एका तालुक्यात पावसाची हजेरी थोडी बरी राहिली. औरंगाबाद जिल्ह्यातील ६५ पैकी ३१ मंडळांत तुरळक ते हलक्या स्वरूपाची हजेरी पावसाने लावली. सोमवारी दुपारी पैठण तालुक्यातील जायकवाडी व पैठण परिसरात महिनाभरानंतर प्रथम पावसाने जोरदार हजेरी लावली. तर औरंगाबाद शहर व परिसरातही दुपारपर्यंत थांबून थांबून पाऊस सुरू होता.
शहरात दुपारनंतर पावसाचा जोर वाढला होता. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ३५ मंडळांत पावसाने हजेरी लावली. ढोकसाळ, वाटूर, वाग्रुळ जहांगीर मंडळात थोडा बरा पाऊस झाला. जांबसमर्थ, राणिउंचेगाव, कुंभारपिंपळगाव, गोंदी, परतूर, आदी ठिकाणी सोमवारी दुपारीही कमी अधिक प्रमाणात पावसाची रिपरिप सुरूच होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील २९ मंडळांत पावसाची हजेरी लागली. तुळजापूर तालुक्यात पावसाचा जोर थोडा अधिक होता. या तालुक्यात सरासरी १३.४३ मिलिमीटर पाऊस नोंदल्या गेला. सोमवारी दुपारपर्यंत अनदूर, ईट, तुरोरी, उमरगा शहरासह परिसरात, खामसवाडी, आलूर, अनाळा, मंगरूळ, देवधानोरा, जेवळी, आलूर, बलसूर आदी ठिकाणी रिमझिम, हलका मध्यम ते भीज स्वरूपाचा पाऊस सुरू होता. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात २२ मिलिमीटर तर माहूर तालुक्यात सरासरी ३३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उमरी तालुक्यातही सरासरी १७ मिलिमीटर पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्यातील ८० मंडळांपैकी ५७ मंडळांत पावसाची हजेरी लागली. बीड जिल्ह्यातही १९ मंडळांत लागलेली पावसाची हजेरी तुरळक ते हलक्या स्वरूपाची राहिली. लातूर जिल्ह्यातही ३८ मंडळांत तुरळक ते हलका पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील ३० पैकी २७ मंडळांत पाऊस झाला.
- 1 of 1030
- ››