‘स्वच्छ सर्वेक्षण अभियानात  ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा’ : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर ः ‘‘जिल्ह्यातील स्वच्छतेचे गुणांकन ठरवण्यासाठी गुणात्मक व संख्यात्मक मानांकनाच्या आधारे स्वतंत्र संस्थेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ हा सर्वेक्षणाचा कार्यक्रम होणार आहे.
‘In the Clean Survey Campaign Gram Panchayats should participate '
‘In the Clean Survey Campaign Gram Panchayats should participate '

सोलापूर ः ‘‘जिल्ह्यातील स्वच्छतेचे गुणांकन ठरवण्यासाठी गुणात्मक व संख्यात्मक मानांकनाच्या आधारे स्वतंत्र संस्थेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ हा सर्वेक्षणाचा कार्यक्रम होणार आहे. ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.  जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यासंबंधी बैठक घेतली. बैठकीच्या प्रारंभी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी शंभरकर व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख उपस्थित होते.  श्री. शंभरकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वेक्षण तीन घटकांमध्ये केले जाणार आहे. सेवाविषयक प्रगती ३५० गुण, थेट निरीक्षण ३०० व नागरिकांचा प्रतिसाद ३५० गुण असतील. किमान ३० ग्रामपंचायतीमध्ये शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, धार्मिक स्थळे, बाजाराची ठिकाणे, या ठिकाणी स्वच्छतेसंदर्भात सद्यःस्थितीची पडताळणी केली जाईल. संस्थात्मक ठिकाणांवरील स्वच्छता, १५ व्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेली स्वच्छतेची कामे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत केलेली कामे या बाबी विचारात घेण्यात येतील,’’ असेही ते म्हणाले.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com