सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळावर गैरप्रकाराचे आरोप 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर झालेल्या गैरप्रकाराच्या तक्रारीनंतर राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळावर गैरप्रकाराचे आरोप 
Allegations of malpractice against the Board of Directors of Solapur Market Committee

 सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर झालेल्या गैरप्रकाराच्या तक्रारीनंतर राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी विशेष लेखा परीक्षक विष्णू डोके यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांचे चौकशी पथक नियुक्त केले आहे.  सूर्यकांत व्हनमाने आणि बसवराज माळगे यांनी यासंबंधीची तक्रार दिली आहे. प्रामुख्याने ई-नाम योजनेची अंमलबजावणी, सीसीटीव्ही कॅमेरे, बाजार समितीच्या ठेवी, आडत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक, सभापतींचे अधिकार उपसभापतींना व सभापती देशमुख यांच्या मालकीच्या जागेबाबत सहकारमंत्री पाटील यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीवरून सहकारमंत्री पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सभापती यांनी उपसभापती यांना सह्यांचे अधिकार देऊन कायद्यातील तरतुदींचा भंग केला आहे. उपसभापती यांनी केलेल्या बेकायदा कामकाजाची चौकशी करण्यात यावी. कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम मुदतीत जमा करणे आवश्यक असताना भरणा केली नाही, या मुद्याचाही यात समावेश आहे.  तिघांची चौकशी समिती  सहकारमंत्र्यांच्या या आदेशानंतर जिल्हा उपनिबंधक भोळे यांनी विशेष लेखापरीक्षक विष्णू डोके यांच्यासह तीन जणांची चौकशीसाठी नियुक्ती केली आहे. त्यांनीही पाच कर्मचारी मदतीला घेतले आहेत. या तक्रारीनुसार आता चौकशी सुरु होणार असून, बाजार समितीला माहिती उपलब्ध करून देण्यासाठी पत्र देण्यात आले आहे. लवकरच चौकशी करण्यात येईल, असे डोके यांनी सांगितले.    बाजार समितीच्या जागांवर व्यापाऱ्यांची कर्जे  काही आडत व्यापाऱ्यांनी बाजार समितीच्या मालकीच्या जमिनीवर कर्ज काढले असून, त्यावर बोजाही नोंद केला आहे, पण त्यासाठी बाजार समितीची परवानगी घेतली नाही. अनेक आडत व्यापारी विनापरवाना व्यवसाय करतात, त्यांच्याकडून सेस वसूल करणे अपेक्षित असताना कोणतीही कारवाई केली जात नाही. तूर, उडीद व मूग या मालाच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली आहे, असेही या तक्रारीत म्हटले आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.