सोलापूर जिल्ह्यातील एकरावरील फळबागा धोक्‍यात

केम : करमाळा तालुक्‍यातील केम, मलवडी व सभोवतालच्या गावातील हजारो एकरावरील द्राक्ष, डाळिंब बागांना अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. या फळबागा पूर्णपणे धोक्‍यात आल्या असून शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो आहे.
Orchards per acre in Solapur district in danger
Orchards per acre in Solapur district in danger

सोलापूर, केम : करमाळा तालुक्‍यातील केम, मलवडी व सभोवतालच्या गावातील हजारो एकरावरील द्राक्ष, डाळिंब बागांना अवकाळी पावसाचा जबर फटका बसला आहे. या फळबागा पूर्णपणे धोक्‍यात आल्या असून शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागतो आहे. केम येथील अनेक शेतकऱ्यांनी यंदा पहिल्यांदाच द्राक्ष बाग लावली आहे. लाखो रुपये खर्च करून द्राक्ष फळबाग लागवड केली आहे. त्यासाठी फाउंडेशन, बेदाणाशेड, औषध फवारणी, मजुरी या सगळ्यांचा खर्च लाखो रूपयांच्यावर झाला आहे. मात्र, अवकळी पावसानंतर उत्पन्नाच्या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पावसामुळे पाणी तरळताना दिसत आहे. परिणामी शासनाकडून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.  ऐनवेळी डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, थंडी, धुके या नैसर्गिक संकटांचा एकाच वेळी फटका बसत असल्याने द्राक्ष घडांवर घडकूज, मणीगळ, दावण्या, भुरी यासारख्या रोगांचा प्रचंड प्रादुर्भाव होत आहे. परिणामी काही जणांच्या वावरात पाणी साठून राहिल्याने मूळकूज होत असून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके डोळ्यासमोर नेस्तनाबूत होत आहेत. येथील बहुतेक शेतकऱ्यांचे द्राक्ष पीक यंदा पहिलेच पिक आहे. केम मंडलमध्ये सर्वाधिक पाऊस करमाळा तालुक्‍यात सर्वात जास्त पावसाची नोंद केम मंडलमध्ये झाली आहे. वादळी वारे व मेघगर्जनेह पाऊस झाला आहे. द्राक्ष, डाळिंब यासारख्या प्रमुख पिकांबरोबरच ऐन बहरात आलेली ज्वारी, कडबा भुईसपाट झाला आहे. तसेच केळीची खुटाडे पडली आहेत. सतत फवारण्या करून कष्टाने पिकविलेला कांदा जागच्या जागी वावरात सडून गेला आहे. ऊस वाहतूक जागीच ठप्प झाली आहे. ऊसतोड मजुरांचे आतोनात हाल होत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com