‘सिद्धेश्वर’ च्या अध्यक्षपदी काडादी, उपाध्यक्षपदी चाकोते 

सोलापूर ः कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष अण्णाराज ऊर्फ पुष्पराज धर्मराज काडादी यांची तर उपाध्यक्षपदी सिद्धाराम बाबूराव चाकोते यांची एकमताने निवड करण्यात आली.
‘सिद्धेश्वर’ च्या अध्यक्षपदी काडादी, उपाध्यक्षपदी चाकोते 
Pushparaj Kadadi as the President of Siddheshwar and Siddaram Chakote as the Vice President

सोलापूर ः कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष अण्णाराज ऊर्फ पुष्पराज धर्मराज काडादी यांची तर उपाध्यक्षपदी सिद्धाराम बाबूराव चाकोते यांची एकमताने निवड करण्यात आली.  कारखान्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक (सहकार) कुंदन भोळे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालकांची पदाधिकारी निवडीची विशेष सभा झाली. त्यात अध्यक्षपदासाठी काडादी यांचा आणि उपाध्यक्षपदासाठी चाकोते यांचा प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे भोळे यांनी जाहीर केले. नूतन अध्यक्ष काडादी यांचे सूचक गुरुराज माळगे तर अनुमोदक अँड. शिवशंकर बिराजदार हे तर उपाध्यक्ष चाकोते यांचे सूचक अरुण लातुरे आणि अनुमोदक राजशेखर पाटील हे होते. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी भोळे आणि सहायक निवडणूक अधिकारी आबासाहेब गावडे यांचा कारखान्याच्या सत्कार करण्यात आला. नूतन अध्यक्ष पुष्पराज काडादी यांनी आजोबा आणि वडलांच्या आदर्शाचा वारसा आपण नूतन संचालकांच्या सहकार्याने पुढे नेत आदर्शवत कार्य करू, अशी ग्वाही दिली. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.