चोपडा साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन 

चोपडा, जि.जळगाव : चोपडा साखर कारखान्याचे काही कायम व काही हंगामी कर्मचारी यांना तीन महिन्यांपासून कामावर घेतले नाही. ठराव करूनही काही कर्मचाऱ्यांना कामावर न घेतल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी चहार्डी येथील कारखाना साइटवर बुधवारी (ता. २९) सकाळी दहाला बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
चोपडा साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन 
Chopda sugar factory workers' bear agitation

चोपडा, जि.जळगाव : चोपडा साखर कारखान्याचे काही कायम व काही हंगामी कर्मचारी यांना तीन महिन्यांपासून कामावर घेतले नाही. ठराव करूनही काही कर्मचाऱ्यांना कामावर न घेतल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी चहार्डी येथील कारखाना साइटवर बुधवारी (ता. २९) सकाळी दहाला बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष व काही संचालकांनी विश्वासघात केला असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला.  निवेदनात म्हटले, ‘‘कारखाना बारामती ॲग्रो यांना भाडेतत्त्वावर चालविण्यास संचालक मंडळाने शेतकरी व कर्मचारी यांना विश्वासात घेऊन दिला आहे. सेवेत असलेले कर्मचारी यांचा थकीत पगार न मागता सर्व कर्मचारी कामावर राहतील, असे सांगून कर्मचाऱ्यांकडून तोंडी ठराव भाडेतत्त्वावर देण्याबाबत आमच्याकडून करून घेतला. कर्मचाऱ्यांना बारामती ॲग्रो पूर्ववत कामावर घेतील, एकाही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही संचालक व अध्यक्ष यांनी बैठकीत घेऊन आम्हाला वेळोवेळी दिली. सर्व कर्मचाऱ्यांनी संचालकांवर विश्वास ठेवला. परंतु आता दोन महिने होऊनदेखील काही कर्मचारी कामावर घेतलेले नाही. तुम्हाला कामावर घेऊ, असे खोटे आश्वासन देत आम्हाला गाफील ठेवून नव्याने कर्मचारी भरती केली आहे.  कर्मचाऱ्यांना जोपर्यंत कामावर घेत नाहीत, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू राहील, असे कामगारांचे म्हणणे आहे. या आंदोलनात शरद बोरसे, पंकज पाटील, विजय रायसिंग, सुधाकर शेटे, दीपक भामरे, गणेश सूर्यवंशी, माधवराव शिरसाळे, कल्याणसिंग पाटील, विजेंद्र सोनवणे, अशोक नेरकर, संदीप कोळी, भगवान पाटील, कैलास पाटील, संजय महाजन, भागवत मोरे यांसह ३५ ते ४० कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.