पंढरपुरातील विकासकामे दर्जेदार व्हावीत :नीलम गोऱ्हे

सोलापूर ः पंढरपुरात वारीनिमित्त लाखो भाविक येतात. वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा देण्यात येत आहेत. येत्या एक-दोन वर्षांत यामध्ये सुधारणा होऊन दर्शनरांगेसाठी स्काय वॉक, पद्मावती उद्यान, यमाई तलाव, ६५ एकर परिसर या ठिकाणची कामे होत आहेत.
पंढरपुरातील विकासकामे दर्जेदार व्हावीत :नीलम गोऱ्हे
Development work in Pandharpur should be of quality

सोलापूर ः पंढरपुरात वारीनिमित्त लाखो भाविक येतात. वारकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा देण्यात येत आहेत. येत्या एक-दोन वर्षांत यामध्ये सुधारणा होऊन दर्शनरांगेसाठी स्काय वॉक, पद्मावती उद्यान, यमाई तलाव, ६५ एकर परिसर या ठिकाणची कामे होत आहेत. ही सर्व कामे दर्जेदार व्हावीत, असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. 

पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आढावा आणि इतर कामे याबाबत ऑनलाइन बैठकीत श्रीमती गोऱ्हे बोलत होत्या. या बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह मुंबईहून उपसचिव सतीश मोघे, सुनील उंबरे उपस्थित होते. 

श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘नगरपालिका प्रशासन व मंदिर समितीने आवश्यकता कामे तत्काळ करावीत. मंदिर समिती मार्फत बांधण्यात येणाऱ्या दर्शन मंडप व स्काय वॉक भाविकांना आवश्यक सुविधेसह उपलब्ध करून द्या. यासाठी स्वच्छतागृहे, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक यंत्रणा आदी सुविधांचा समावेश करावा. याबाबत महाराज मंडळी, भाविक यांच्या सूचनांचाही विचारा करावा. शेगावमधील आनंद सागर उद्यानाच्या धर्तीवर उद्यान उभारणीसाठी तत्काळ जागेची निश्‍चिती करून नगरपालिकेने प्रस्ताव सादर करावा. पंढरपूर नगरपालिकेने पद्मावती उद्यान दुरुस्तीसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून दुरुस्तीची कार्यवाही करावी अथवा अर्बन फॉरेस्ट अंतर्गत उद्यानाची उभारणी करावी,’’ असे निर्देशही श्रीमती गोऱ्हे यांनी या वेळी दिले. 

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यासंबंधी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले. ‘नममि चंद्रभागा’ अभियानांतर्गत लगतच्या विविध गावांत जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात आले असून, त्यामध्ये चंद्रभागा स्वच्छतेबाबतचे महत्त्व पटवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सांगितले.  डीपीआर तयार  मंदिराला मूळ रूप देण्यासाठी पुरातत्व विभागाकडून पाहणी करून डीपीआर तयार करण्यात आला आहे. तसेच नव्याने प्रस्तावित असलेल्या दर्शनमंडप व स्काय वॉकमध्ये वारकऱ्यांच्या व भाविकांच्या आवश्यक सुविधांचा विचार करून स्वच्छतेच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे, याचा खर्च मंदिर समिती तसेच भाविकाच्या देणगी स्वरूपाच्या निधीतून करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अधिकारी श्री. गुरव यांनी सांगितले. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.