टास्क फोर्समुळे योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या : छगन भुजबळ

नाशिक: संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी टास्क फोर्स गठित करण्यात आल्याने योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविल्या जात आहेत. तसेच बँकांमार्फत ही मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप झाल्याने त्यांच्या समस्या कमी होऊन मागील वर्षांच्या तुलनेत शेतकरी आत्महत्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
टास्क फोर्समुळे योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्या : छगन भुजबळ
Due to the task force, the schemes reached the farmers

नाशिक: संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी टास्क फोर्स गठित करण्यात आल्याने योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविल्या जात आहेत. तसेच बँकांमार्फत ही मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप झाल्याने त्यांच्या समस्या कमी होऊन मागील वर्षांच्या तुलनेत शेतकरी आत्महत्यांमध्ये लक्षणीय घट झाली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

शहरातील पोलिस संचलन मैदानात भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य ध्वजवंदन समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी जनतेला शुभेच्छा देताना पालकमंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर, पोलिसआयुक्त दिपक पांडेय, महाराष्ट्र पोलिस अकादमीचे संचालक, जिल्हाधिकारी सूरज मांढरे,आयुक्त कैलास जाधव, पोलिस अधिक्षक सचिन पाटील, सीईओ लीना बनसोड उपस्थित होते.            भुजबळ म्हणाले, ‘‘पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय महसूल परिषदेत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांसाठी राधाकृष्ण गमे विभागीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या उभारी उपक्रमासाठी तसेच ऑनलाइन ७/१२आणि सेल्फ बिनशेती चलन वितरण कार्यप्रणालीचे कौतुक करण्यात आले. सेवा हमी कायद्यात सर्वाधिक १०१ सेवांचा समावेश करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या या योजनेचा विस्तार राज्यभर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे व यासाठी त्यांना भारतीय लोक प्रशासन संस्थेचा लोक प्रशासनातील नावीन्यपूर्ण कामगिरी साठीचा डॉ.गडकरी स्मृती पुरस्कार देखील प्रदान करण्यात आल्याने भुजबळ यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेले ‘एक मूठ पोषण’,‘कोरोनामुक्त गाव अभियान’,‘रानभाज्या महोत्सव' हे उपक्रम प्रशंसनीय असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.’’  जिल्ह्याला सर्वांगाने समृद्ध बनविण्यासाठी सहकार्य करावे  कोरोनाच्या संकटकाळात जिल्हा प्रशासन,जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, पोलिस विभाग तसेच महानगरपालिका आणि इतर सर्व यंत्रणा नियोजनबद्ध काम करीत आहे.कोरोनाच्या नायनाट करण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा उपाय असल्याने नागरीकांनी लसीकरण करून घेण्यासाठी पुढाकार घेऊन त्रिसूत्रीचे पालन करावे.जिल्ह्याला सर्वांगाने समृद्ध बनविण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहनही भुजबळ यांनी केले आहे.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.