नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार निर्मितीसाठी प्रयत्न 

नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असून, तालुक्यात बाजार समितीसाठी डांगसौंदाणे येथे उपबाजार व लखमापूर येथे खरेदी-विक्री केंद्र निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती पंकज ठाकरे यांनी दिले.
नाशिक :  डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार निर्मितीसाठी प्रयत्न 
Efforts to construct sub-market premises at Dangsaundane

नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असून, तालुक्यात बाजार समितीसाठी डांगसौंदाणे येथे उपबाजार व लखमापूर येथे खरेदी-विक्री केंद्र निर्मितीसाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती पंकज ठाकरे यांनी दिले. 

सोमवार (ता.३) दुपारी १ वाजता सटाणा कृषी उत्पन्न बाजार(कृ.उ.बा.) समितीचे मावळते सभापती संजय देवरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी कृ.उ.बा. सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा बागलाणचे सहायक निबंधक जितेंद्र शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. या वेळी नूतन सभापतिपदी तालुक्यातील तळवाडेदिगर गणातील पंकज ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली. त्या वेळी ते बोलत होते. 

ठाकरे यांच्या नावाची सूचना संचालक श्रीधर कोठावदे व सरदारसिंग जाधव यांनी मांडली. प्रकाश देवरे यांनी त्यास अनुमोदन दिले. विहित कालावधीत एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे ठाकरे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. या वेळी उपसभापती मधुकर देवरे, प्रकाश देवरे, वेणूबाई माळी, मंगला सोनवणे, प्रभाकर रौदळ, रत्नमाला सूर्यवंशी, संजय बिरारी, केशव मांडवडे, संजय सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, सुनीता देवरे, तुकाराम देशमुख, नरेन्द्र आहिरे, संदीप साळे आदी संचालक उपस्थित होते. निवडीनंतर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे, पप्पूतात्या बच्छाव, मुन्ना सूर्यवंशी, रमेश आहिरे आदींसह पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांचा सत्कार केला. कृ.उ.बा. सचिव भास्कर तांबे यांनी आभार प्रदर्शन केले.       उपस्थितांनी बाजार समिती आवारातील सहकारमहर्षी स्व.दगाजी पाटील व शहरातील शिवछत्रपती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करून जल्लोष केला.   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.