जळगावमधील बारा बाजार समित्यांच्या संचालक मंडळांना मुदतवाढ 

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सुमारे बारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांना चौथ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. याबाबतचे पत्र सहकार पणन विभाग मुंबई यांच्याकडून बाजार समित्यांना प्राप्त झाले आहे.
जळगावमधील बारा बाजार समित्यांच्या संचालक मंडळांना मुदतवाढ 
Extension of Board of Directors of Twelve Market Committees in Jalgaon

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सुमारे बारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांना चौथ्यांदा मुदतवाढ मिळाली आहे. याबाबतचे पत्र सहकार पणन विभाग मुंबई यांच्याकडून बाजार समित्यांना प्राप्त झाले आहे. 

जळगाव जिल्ह्यातील रावेरसह बारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळांची पंचवार्षिक निवडणुकीची मुदत १५ नोव्हेंबर २०२० मध्ये संपली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका घेणे शक्य नसल्यामुळे शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांना तब्बल चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे. २३ जानेवारीपर्यंत या संचालक मंडळांना मुदतवाढ देण्यात आली होती. ती पुन्हा तीन महिने वाढवून देण्यात आली आहे. याबाबत राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सह सचिव (पणन) डॉ. सुग्रीव धपाटे यांचे पत्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांना प्राप्त झाले आहे. यामुळे पुढील तीन महिन्यांच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. शासनाने यापूर्वी दोनदा सहा महिने व एकदा तीन महिने व आता पुन्हा तीन महिने मुदतवाढ दिली आहे. मात्र संचालक मंडळांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही. काही विशिष्ट अपवादात्मक परिस्थितीत धोरणात्मक निर्णय घ्यावयाचा झाल्यास शासनाची मान्यता घ्यावी लागणार आहे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.