उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा

चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा या वर्षी बारामती ॲग्रो यांनी भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतला असून, ‘चोसाका’ कडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २०१४-१५ या वर्षाचे सहाशे रुपयेप्रमाणे कोट्यवधी रुपये थकीत असताना ते पैसे शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ प्रमाणे देणे बंधनकारक असून, ते पैसे आठ दिवसांत मिळावेत, यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन दिले आहे.
उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा
Farmers go on hunger strike for sugarcane exhaustion

चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा या वर्षी बारामती ॲग्रो यांनी भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतला असून, ‘चोसाका’ कडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे २०१४-१५ या वर्षाचे सहाशे रुपयेप्रमाणे कोट्यवधी रुपये थकीत असताना ते पैसे शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ प्रमाणे देणे बंधनकारक असून, ते पैसे आठ दिवसांत मिळावेत, यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन दिले आहे. आठ दिवसांत शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट मिळावे, अन्यथा ४ जानेवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात बेमुदत उपोषण करू, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन निकम, कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील, बाजार समितीचे माजी सभापती नारायण पाटील, रमेश पाटील (रुखनखेडा), मोहन पाटील, विवेक पाटील (तावसे खुर्द), सुधाकर पाटील (चहार्डी), गुलाबराव निकम, चंद्रशेखर निकम (माचले), कुलदीप पाटील (विरवाडे) यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.  पेमेंट आठ दिवसांपूर्वीच खात्यात वर्ग : गुळवे  तालुक्यातील शेतकरी संघटना, कृती समिती व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चोपडा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांच्या थकीत पेमेंटसंदर्भात तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले, ‘‘की शेतकऱ्यांचे थकीत ६०० रुपयेप्रमाणे सर्व पेमेंट आम्ही आठ दिवसांपूर्वीच ‘चोसाका’ च्या खात्यावर वर्ग केले आहे.’’   

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.