लासलगाव स्टेशनवर किसान रेल्वेच्या बॉक्सची संख्या वाढवून द्या - जगताप

नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा, भुसार, तेलबिया, डाळिंब यासह फळे व भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीसाठी नावाजलेली आहे. लासलगाव व परीसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात द्राक्षे शेतीमालाचे देखील उत्पादन घेत आहे.
लासलगाव स्टेशनवर किसान रेल्वेच्या बॉक्सची संख्या वाढवून द्या - जगताप
Increase the number of Kisan Railway boxes at Lasalgaon station - Jagtap

नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा, भुसार, तेलबिया, डाळिंब यासह फळे व भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीसाठी नावाजलेली आहे. लासलगाव व परीसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात द्राक्षे शेतीमालाचे देखील उत्पादन घेत आहे. या अनुषंगाने किसान रेल्वेद्वारे जास्तीत जास्त प्रमाणात शेतीमाल बाहेरगांवी पाठविता यावा, यासाठी मध्य रेल्वेच्या लासलगाव स्टेशनवर किसान रेल्वेचे तीन ते चार बॉक्स (व्हीपी) मिळावे, अशी मागणी बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.          केंद्र सरकारने जिल्ह्यातील शेतीमालाचा विचार करून मध्य रेल्वेची किसान रेल्वे सुरू केलेली आहे. या रेल्वेने लासलगाव व परिसरातील व्यापारी व शेतकरी लासलगाव रेल्वे स्टेशनवरून मोठ्या प्रमाणात त्यांचा कांदा, डाळिंब, फळे व इतर सर्व प्रकारचा भाजीपाला परराज्यांत विक्रीसाठी पाठवीत आहे; परंतु मध्य रेल्वेने किसानसेवा रेल्वे गाडीस यापूर्वी लासलगाव स्टेशनवर दोन बॉक्स (व्हीपी) उपलब्ध करून दिले होते. मागील १० दिवसांपासून मध्य रेल्वेने लासलगाव स्टेशनवर किसानसेवा रेल्वे गाडीच्या दोन बॉक्सची (व्हीपी) संख्या कमी करून आजमितीस फक्त एकच बॉक्स (व्हीपी) उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे येथील व्यापारी व शेतकरी वर्गास या रेल्वेने शेतमाल परराज्यात विक्रीसाठी पाठविण्यास अडचण येत आहे.          सध्या लासलगाव व परिसरात द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला असून, द्राक्षमाल पाठविण्यासाठी येथील व्यापारी व शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार आहे. या वस्तुस्थितीचा विचार करून लासलगाव व परिसरातील शेतमाल किसानसेवा रेल्वेद्वारे जास्तीत जास्त प्रमाणात बाहेरगांवी पाठविता यावा यासाठी मध्य रेल्वेच्या लासलगाव स्टेशनवर किसानसेवा रेल्वेचे तीन ते चार बॉक्स (व्हीपी) मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com