पंढरपूर, सांगोला, मंगळवेढ्यासाठी सधन कुक्कुट विकास योजना 

सोलापूर ः जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या तीन तालुक्यांतून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर सधन कुक्कुट विकास गट योजना राबवण्यात येणार आहे.
Intensive Poultry Development Scheme for Pandharpur, Sangola, Mars
Intensive Poultry Development Scheme for Pandharpur, Sangola, Mars

सोलापूर ः जिल्ह्यातील पंढरपूर, सांगोला व मंगळवेढा या तीन तालुक्यांतून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर सधन कुक्कुट विकास गट योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सोलापूर कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे.  सधन कुक्कुट गटासाठी पन्नास टक्के अनुदानावर पशुपालक लाभार्थ्यांची सर्व प्रवर्गातून प्रतितालुका एक या प्रमाणे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. एकूण प्रकल्प किंमत रुपये १० लाख २७ हजार ५०० रुपये पैकी सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना पन्नास टक्के अनुदान म्हणजेच पाच लाख १३ हजार ७५० रुपये शासनाचे अनुदान देण्यात येणार आहे. उर्वरित पन्नास टक्के रक्कम लाभार्थी स्वतःचा हिस्सा किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभा करू शकतील. इच्छुक लाभार्थींनी संबंधित पंचायत समिती येथील पशुधन विकास अधिकारी (वि) लगतच्या तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्यालय / पशुवैद्यकीय दवाखाना यांच्याकडे ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करावा, असेही आवाहन कऱण्यात आले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com