जळगाव ः बोगस पशुवैद्यकांची यादी प्रशासनाला सादर; जिल्हा दूध संघाचा दावा 

जळगाव ः जिल्ह्यात बोगस डॉक्टर, बोगस पॅथॅलॉजी लॅब चालकांच्या उपद्रवानंतर आता चक्क बोगस ढोर (व्हेटनरी) डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.
List of bogus veterinarians submitted to administration; District Milk Association claims
List of bogus veterinarians submitted to administration; District Milk Association claims

जळगाव ः जिल्ह्यात बोगस डॉक्टर, बोगस पॅथॅलॉजी लॅब चालकांच्या उपद्रवानंतर आता चक्क बोगस ढोर (व्हेटनरी) डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांत चाळीसच्या वर बोगस डॉक्टरांनी मुक्या प्राण्याच्या जिवाशी खेळ चालवला असून, ग्रामीण जनतेची फसवणूक होत असल्याबाबत जिल्‍हाधिकाऱ्यांना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे.  जिल्‍हा दूध उत्पादक संघातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज राजपूत यांनी दिलेल्या निवेदनानुसार जळगाव जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणाअंती प्रत्येक तालुक्यात किमान चार-पाच बोगस व्हेटनरी डॉक्टरांकडून पाळीव प्राण्यांवर शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे आढळून आले आहे. या डॉक्टरांची माहिती संकलित केल्यावर स्टेट व्हेटनरी कौन्सिलमध्ये त्यांच्या नावांची कुठलीही नोंद नसून सर्रासपणे त्यांचा उद्योग सुरू आहे. या बोगस डॉक्टरांकडून प्राण्यावर उपचारासहित कुठलेही शास्त्रशुद्ध ज्ञान नसताना प्राण्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. अशा डॉक्टरांच्या नावाची यादीच डॉ. राजपूत यांनी निवेदनासोबत जोडली असून, कारवाईची मागणी केली आहे.  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस व्हेटनरी डॉक्टरांनी प्रॅक्टिस चालवली आहे. त्याचा दुष्परिणाम मुक्या प्राण्यांवर होत असून, गोरगरीब शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे काम ही मंडळी सर्रास करत आहे. जिल्‍हा प्रशासनाने याकडे लक्ष पुरवून तातडीने या मंडळींवर गुन्हे दाखल करावेत.  -डॉ. पंकज राजपूत,  पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्‍हा दूध उत्पादक संघ, जळगाव   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com