खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची पेरणी वाढणार 

जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत. लागवड सध्या रखडत आहे. यंदा सर्वत्र मिळून सुमारे ३५ हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी स्थिती आहे.
Maize cultivation in Khandesh will decline Wheat, millet sowing will increase
Maize cultivation in Khandesh will decline Wheat, millet sowing will increase

जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत. लागवड सध्या रखडत आहे. यंदा सर्वत्र मिळून सुमारे ३५ हजार हेक्टरवर लागवड होईल, अशी स्थिती आहे. 

मका दर अस्थिर आहेत. त्याला पुढे उठाव राहील की नाही, अशी समस्यादेखील आहे. कारण पुन्हा एकदा कोविड व लॉकडाउनचे संकेत मिळत आहेत. मक्याचे दर लॉकडाउनमध्ये प्रतिक्विंटल ९०० रुपये एवढेच मिळाले होते. पोल्ट्री उद्योगाला लॉकडाउनमध्ये दणका बसला होता. तसेच प्रक्रिया उद्योगही बंद होते. यामुळे मक्याला उठाव नव्हता. आता मका दरात सुधारणा झाली आहे. पण पुढे दर टिकून राहतील की नाही, याची शाश्‍वती नाही. तसेच मका पिकावर लष्करी अळी सतत येत आहे. तीन फवारण्या घ्याव्याच लागतात. यात एकरी सहा ते सात हजार रुपये खर्च वाढला आहे. यामुळे शेतकरी मका लागवड टाळतील, असे दिसत आहे.  मक्याची लागवड गेल्या वर्षी खानदेशात सुमारे ४२ हजार हेक्टरवर झाली होती. यंदा फक्त ३५ हजार हेक्टरवर लागवड होईल, असे दिसत आहे. मक्याऐवजी गहू, बाजरी व इतर फळ, भाजी पिकांची लागवड शेतकरी करतील. मका लागवड सध्या सुरूच आहे. अनेक शेतकरी पावसाळी वातावरणामुळे लागवड करू शकलेले नाहीत. पण लागवड पुढील आठ ते १० दिवसच होईल. त्यापुढे लागवड केली जाणार नाही. यानंतर बाजरीची पेरणी सुरू होईल. जळगाव जिल्ह्यात सुमारे २५ ते २८ हजार हेक्टरवर, तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे १० ते ११ हजार हेक्टरवर मका लागवड होईल. जळगाव जिल्ह्यात चोपडा, जळगाव, जामनेर, यावल या भागात लागवड अधिक होईल. धुळ्यात शिरपुरात अधिकची लागवड होऊ शकते, अशी माहिती आहे.  

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com